Virat Kohli - Stuart Broad X
क्रीडा

SA vs IND: टीम इंडियाच्या कामी आली ब्रॉडची ट्रिक, विराटने लावलं डोकं अन् मग..., पाहा Video

Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीने ब्रॉडप्रमाणेच एक ट्रिक वापरली होती, ज्याचा फायदा भारतीय संघाला झाला.

Pranali Kodre

Virat Kohli use stuart broad's Change of bails Trick that work for India against South Africa in Centurion Test:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात मंगळवारपासून (26 डिसेंबर) कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. सेंच्युरियनला सुरू असलेला हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. दरम्यान, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वापरलेल्या एका ट्रिकची जोरदार चर्चा होत आहे.

झाले असे की या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघ 67.4 षटकात 245 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीला उतरला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेनेही एडेन मार्करमची विकेट लवकर गमावली.

मात्र, नंतर अखेरची मालिका खेळणारा डीन एल्गार आणि टोनी डी झोर्झी यांची जोडी जमली. या दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिरेचा डाव सावरला. हे दोघेही शतकी भागीदारी करण्याकडे वाटचाल करत होते.

पण याचदरम्यान 28 वे षटक संपल्यानंतर विराट कोहलीने जाऊन स्टंपवरील बेल्सची अदला-बदली केली. विशेष म्हणजे 29 व्या षटकात जसप्रीत बुमराहने झोर्झीला 28 धावांवर बाद केले. त्यामुळे झोर्झी आणि एल्गार यांची 93 धावांची भागीदारी तुटली.

त्यानंतर ३१ व्या षटकात बुमराहने किगन पीटरसनलाही लगेचच 2 धावांवर बाद केले. या घटनेचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे.

मात्र, विराटची ही ट्रिक डीन एल्गारविरुद्ध कामी आली नाही. एल्गारने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरत शतक पूर्ण केले.

ब्रॉडची कल्पना

बेल्सची आदला-बदली करणारा विराट पहिला खेळाडू नाही. यापूर्वी 2023 ऍशेस मालिकेत इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने बेल्सची आदला-बदली करण्याची ट्रिक वापरली होती. विशेष म्हणजे त्यावेळी त्याला विकेट्सही मिळाल्या होत्या. त्यात मार्नल लॅब्युशेनच्या विकेटचाही समावेश आहे.

दरम्यान, विराटनेही ही ट्रिक जेव्हा वापरली, तेव्हा समालोचकांकडून माहिती देण्यात आलेली की ब्रॉडने जेव्हा असे केले होते, तेव्हा त्याने सांगितले होते की त्याने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनला असे करताना पाहिले होते. विराटने बेल्सची आदला-बदली केल्याचे पाहून स्टुअर्ट ब्रॉडने प्रतिक्रियाही दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेकडे आघाडी

दरम्यान, या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने 66 षटकात 5 बाद 256 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गारने नाबाद 140 धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे सध्या 11 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशी डेव्हिड बेडिंगहॅमनेही ५६ धावांची खेळी केली.

दुसऱ्या दिवसाखेर भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तसेच प्रसिध कृष्णाने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT