Virat Kohli to play 100th Test match News | Virat Kohli Latest News Updates Dainik Gomantak
क्रीडा

आज रंगणार 'किंग कोहली'ची 100 वी कसोटी

दैनिक गोमन्तक

आपल्या देशासाठी कसोटी सामना खेळणे हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी मोठी गोष्ट आहे. जर त्यांना एकापेक्षा जास्त कसोटी खेळण्याची संधी मिळाली तर ते भाग्यवान आहेत आणि ते क्वचितच 100 कसोटी खेळताना दिसून येतात. यामुळेच भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 90 वर्षांच्या इतिहासात केवळ 11 क्रिकेटपटूंना ही कामगिरी करता आली असून आता त्यांच्यामध्ये 12 वे नाव जोडले जाणार आहे ते विराट कोहलीचे. (India v Sri Lanka Mohali Test)

भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाचा माजी कर्णधार आणि सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली 100 कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. मोहालीतील भारत-श्रीलंका कसोटी (India v Sri Lanka Mohali Test) या इतिहासाचे तसेच हजारो चाहते साक्षीदार होणार आहेत. या कसोटीसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असताना, सलग 12-13 वर्षे 98 कसोटी खेळूनही कोहली याबाबत अस्वस्थ दिसून आहे. (Virat Kohli to play 100th Test match)

आपल्या 100 व्या कसोटीपूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) बीसीसीआयला (BBCI) दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चाहत्यांच्या आगमनामुळे हा सामना खूप खास असणार आहे, पण विराट थोडा अस्वस्थही आहे. कोहली म्हणाला की, “मी ऐकले आहे की प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला आहे. ही एक खास सकाळ असेल माझ्यासाठी. मी खोटं बोलणार नाही पण माझ्यात अस्वस्थता आहे. माझ्यामधील ही अस्वस्थता भारतासाठी शेवटचा सामना खेळेपर्यंत राहील. जेव्हा ही अस्वस्थता राहणार नाही, तेव्हा समजा तुमची ही वेळ संपली आहे.

जून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या किंग्स्टन कसोटीत पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीला सुरुवातीच्या कसोटी सामन्यांमध्ये यश मिळू शकले नाही, पण जेव्हा त्याने अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले तेव्हा तेथून माझी वरच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्या शतकाची आठवण करून देताना कोहली म्हणाला की, 'मला माझे पहिले कसोटी शतक अजूनही आठवते, तो माझ्यासाठी नेहमीच खास असेल आणि ऑस्ट्रेलियात राहणे देखील आणखी खास आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 8,000 धावांच्या अगदी जवळ असलेला कोहली म्हणाला की, तुम्ही तुमच्या वातावरणात प्रभाव पाडू शकत असाल तर ही स्वत:साठी अभिमानाची बाब आहे. मी खूप भाग्यवान आहे कारण लोकांना अशी संधी क्वचितच मिळते आणि ती मला मिळाली. मी माझे सर्वस्व या फॉर्मेटला दिले. आणि मी माझ्या क्षमतेनुसार जबाबदारी पार पाडली आहे.

माझ्यासाठी 2015 ते 2020 हा सर्वात खास काळ

या जबाबदारीबद्दल बोलताना कोहलीने सलग 7 वर्षे भारतीय कसोटी संघाची कमान सांभाळली आहे. कोहली जेव्हा कसोटी कर्णधार बनला, तेव्हा भारत आयसीसी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर होता तर त्याच्या पदत्यागाच्या वेळी सलग पाच वर्षे तो नंबर वन कसोटी संघ होता. याबद्दल बोलताना माजी कर्णधार म्हणाला की, 'मला चांगले आठवते जेव्हा मी कसोटी कर्णधारपद स्वीकारले होते, तेव्हा माझ्याकडे संघाची दृष्टी होती आणि आम्ही सलग पाच वर्षे प्रथम क्रमांकावर राहिलो होतो आणि मला याचा अभिमान आहे... 2015 ते 2020 दरम्यान आम्ही ज्या प्रकारे क्रिकेट खेळलो ते स्वतःच खास आहे. आम्ही काही खडतर सामने गमावले आणि काहींमध्ये चांगले पुनरागमन देखील केले. माझ्या या संपूर्ण फेरीचा मला अभिमान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT