Anushka Sharma Virat airport Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Retirement: निवृत्तीपूर्वी विमानतळावर एकत्र दिसले अनुष्का-विराट; नंतर केला 'कसोटीला अलविदा'

Virat Kohli Anushka Sharma Appearance: आजच विराट आणि अनुष्का सोबत दिसल्याने चाहत्यांना विराट नेमका कुठे चाललाय असा प्रश्न पडलाय

Akshata Chhatre

Anushka Virat latest news: भारतीय क्रिकेट संघातील किंग म्हणजेच विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार अशा चर्चा सुरू होत्या आणि तेवढ्यात विराटने स्वतः सोशल मिडियावर पोस्ट करत या बातम्यांना दुजोरा दिलाय. आजच विराट आणि अनुष्का सोबत दिसल्याने चाहत्यांना विराट नेमका कुठे चाललाय असा प्रश्न पडलाय.

विराट अनुष्का सोबत चालले

वायरल भयानी यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, अनुष्का आणि विराट हे मुंबई विमानतळावर एकत्र दिसलेत, यानंतर लगेच विराटने कसोटी क्रिकेटमधून राजीनामा दिला.

विराट आणि अनुष्का दोघेही सकाळी घाईत दिसत होते, मात्र तरीही काहीवेळ थांबून पत्रकारांना फोटो काढू दिले. यावेळी विराट आणि अनुष्का काहीसे गडबडीत होते. अनुष्का काही महत्वाचे कार्डस तपासात होती तर विराट देखील तिच्या सोबत होता.

विराट कोहलीची भावनिक पोस्ट

"कसोटी क्रिकेटचा पोशाख घालून १४ वर्षे झाली. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवलं आणि आयुष्यभर मी जे सहन केलं त्याचे धडे दिले. कसोटी क्रिकेट म्हणजे शांत खेळ, अनेक दिवस चालणारा, हे छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम खेळाडूच्या सोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडतोय पण ते सोपं नाही. मी माझ्याकडे जे काही होते ते सर्व दिलं आहे आणि या खेळाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिलंय. निघून जाताना माझ्या मनात केवळ कृतज्ञाता आहे".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

Horoscope: बुधवारी तुमच्या राशीत काय? मेष-मिथुनला पार्टनरकडून खास भेट, कर्कचे जुने टेन्शन दूर होणार

Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

Goa Nightclub Fire: लुथरा बंधू आज गोव्यात, 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड; गोवा पोलिसांनी दिल्लीत घेतला ताबा

Canacona Missing Boat: मच्छीमार बोट बेपत्ता, तरीही सरकार सुस्त! संतापलेल्या मच्छीमारांनी रोखला मडगाव-कारवार हायवे VIDEO

SCROLL FOR NEXT