Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: कोहलीने दाखवलं विराट मन, श्रीलंकेतील नवोदित क्रिकेटर्सला दिला मोलाचा सल्ला, पाहा स्पेशल Video

Virat Kohli: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहलीचा एका खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Pranali Kodre

Virat Kohli shares his experience with budding cricketers in Sri Lanka: आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोर फेरी सुरू झाली असून आता उर्वरित सर्व सामने कोलंबोमध्ये होणार आहेत. या फेरीत रविवारी (10 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमने-सामने असणार आहेत. त्याआधी विराट कोहलीचा एक खास व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सराव सत्रादरम्यान विराट नवोदित क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करत असल्याचे दिसत आहे. हे क्रिकेटपटू नेट गोलंदाज असल्याचा कयास लावला जात आहे.

दरम्यान, विराट नवोदित क्रिकेटपटूंना यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगत आहे. तसेच त्याने कौशल्य, फिटनेस आणि मानसिक कणखरता यांचेही महत्त्व या क्रिकेटपटूंना सांगितले. त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरही लक्ष देण्यास त्याने सांगितले.

याशिवाय विराटने सल्ला दिलेल्या क्रिकेटपटूंपैकी एकाने सांगितले की विराटने त्यांना प्रोफेशनल राहा आणि स्वत:वर विश्वास ठेवण्यास सांगितले. तसेच शेवटी सरावच तुम्हाला परिणाम देतो असेही सांगितले. त्याचबरोबर या क्रिकेटपटूने सांगितले की विराटला सराव करताना पाहून देखील त्यांना खूप शिकायला मिळते.

दरम्यान, या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया येत असून अनेकांनी विराटचे कौतु केले आहे. या व्हिडिओला बीसीसीआयने कॅप्शन लिहिले आहे की 'प्रेरणायी चर्चेसह तुमच्या विकेंडची सुरूवात करा. विराट कोहलीने नवोदीत क्रिकेटपटूंबरोबर त्याचा अनुभव सांगितला आहे.'

तयारी सुपर फोरची

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने सुपर फोर फेरीतील आपली मोहिम सुरू करेल. भारताला 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे, तर 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे.

या फेरीसाठी भारतीय संघाने कसून तयारी केली आहे. त्याचे फोटोही बीसीसीआयने शेअर केले होते. तसेच भारतीय संघातील खेळाडूंनी जिममध्येही घाम गाळला आहे.

आशिया चषकात भारताने साखळी फेरीत दोन सामने खेळले आहेत. त्यातील पाकिस्तानविरुद्धचा सामना पहिल्या डावानंतर पावसामुळे रद्द झाला, तर नेपाळविरुद्धचा सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. पण भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 10 विकेट्सने विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT