Rohit Sharma - Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध फक्त 10 धावा, तरीही विराट-रोहित जोडी बनली नंबर वन; 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड नावावर

Rohit Sharma-Virat Kohli: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोडीने मिळून वनडेत नवा विश्वविक्रम केला आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023, India vs Sri Lanka, Virat Kohli-Rohit Sharma Partnership Record:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोर फेरीत मंगळवारी भारत विरुद्ध श्रीलंका संघात सामना होत आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोडीने मोठा विक्रम रचला आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारताकडून रोहित आणि शुभमन गिलने 80 धावांची सलामी भागीदारी करत चांगली सुरुवात मिळवून दिली.

मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही गिल 19 धावांवर 12 व्या षटकात बाद झाला. त्यामुळे विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो रोहितला साथ देत असताना रोहितने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, रोहित आणि विराटची जोडी फार काळ टीकू शकली नाही.

विराट 14 व्या षटकात 3 धावांवर बाद झाला. त्यामुळे विराट आणि रोहित यांच्यात 16 चेंडूत 10 धावांचीच भागीदारी झाली. पण असे असले तरी त्यांनी मोठा विश्वविक्रम केला आहे.

विराट आणि रोहित यांच्या 10 धावांच्या भागीदारी दरम्यान वनडेत या दोघांच्या भागीदारीत 5000 धावा पूर्ण झाल्या आहेत. या दोघांनी 86 डावात भागीदारी करताना ५००० धावांचा टप्पा पार केला.

त्यामुळे त्यांची वनडेत भागीदारीमध्ये सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करणारी जोडी ठरली आहे. त्यांनी गोर्डन ग्रिनीज आणि देडमंड हाइन्स यांच्या जोडीचा विक्रम मोडला आहे. ग्रिनीज आणि हाइन्स यांच्या जोडीने 97 वनडे डावात भागादीरी करताना 5000 धावांचा टप्पा पार केला होता.

दरम्यान, मंगळवारी विराट बाद झाल्यानंतर लगेचच रोहित 16 व्या षटकात बाद झाला. रोहितने 48 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतरही कोणताच भारतीय खेळाडू खेळपट्टीवर फार काळ स्थिरावू शकला आहे.

त्यानंतर केवळ इशान किशन आणि केएल राहुल यांनाच 30 धावांचा टप्पा पार करता आला. इशानने 33 धावांची खेळी केली, तर केएल राहुलने 39 धावांची खेळी केली. भारतीय संघाचा डाव 49.1 षटकात 213 धावांवर संपुष्टात आला.

श्रीलंकेकडून दुनिथ वेलालागेने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच चरिथ असलंकाने 4 विकेट्स घेतल्या आणि महिश तिक्षणाने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT