Team India ICC
क्रीडा

IND vs NED: क्रिकेट चाहत्यांना स्पेशल दिवाळी गिफ्ट! विराटनंतर रोहितनेही बॉलिंग करत घेतली विकेट, पाहा Video

Rohit Sharma, Virat Kohli Bowling: रविवारी रोहित शर्माने 11 वर्षांनी, तर विराट कोहलीने 9 वर्षांनी वनडे विकेट घेतली.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands, Virat Kohli, Rohit Sharma Bowling:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (12 नोव्हेंबर) भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात अखेरचा साखळी सामना पार पडला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने 160 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली, ते म्हणजे भारताकडून तब्बल 9 खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यातील 6 जणांचा विकेट्सही मिळाल्या. यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांचा समावेश आहे. त्यामुळे विराट आणि रोहित यांच्या नावावर आता वर्ल्डतक विकेटचीही नोंद झाली आहे.

या सामन्यात भारताने नेदरलँड्स समोर तब्बल 411 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग नेदरलँड्स करत असताना त्यांच्या पहिल्या तीन विकेट्स मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवने घेतली होत्या.

त्यानंतर 25 व्या षटकात विराट गोलंदाजीला आला. हे त्याचे सामन्यातील दुसरे षटक होते. त्याने तिसऱ्या चेंडूवर नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला बाद केले. त्याचा झेलमागे यष्टीरक्षक केएल राहुलने घेतला. त्यामुळे तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा विराटला वनडेत विकेट मिळाली.

त्यानंतर या सामन्यात 48 व्या षटकात रोहित स्वत: गोलंदाजीला आला. त्याआधी त्याने सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांनाही गोलंदाजी करण्याची संधी दिली होती. दरम्यान, रोहितने जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी चेंडू हातात घेतला, तेव्हा नेदरलँड्सच्या ९ विकेट्स गेलेल्या होत्या आणि 240 हून अधिक धावा झालेल्या होत्या.

त्यानंतर रोहितच्या गोलंदाजीवर पहिल्या तीन चेंडूवर एकच धाव नेदरलँड्सला मिळाली, पण चौथ्या चेंडूवर तेजा निदामनुरूने त्याच्याविरुद्ध षटकार खेचला. मात्र त्याच्या पुढच्याच चेंडूवर रोहितने स्विंगवर त्याला बाद केले. तेजाचा झेल मोहम्मद शमीने घेतला.

त्यामुळे रोहितलाही वर्ल्डकपमध्ये विकेट मिळाली. तसेच रोहितने तब्बल 11 वर्षांनंतर वनडेत विकेट घेतली. यापूर्वी त्याने 2012 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनला विकेट घेतली होती.

दरम्यान, विराट आणि रोहित या दोघांनाही विकेट मिळाल्याने अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी हे चाहत्यांसाठी खास दिवाळी गिफ्ट असल्याचे म्हटले.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर नेदरलँड्सचा संघ 411 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 47.5 षटकात 250 धावांवर सर्वबाद झाला. 

तत्पुर्वी भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली. श्रेयसने 94 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांसह 128 धावांची नाबाद खेळी केली. तर केएल राहुलने 64 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 102 धावांची खेळी केली. 

तसेच रोहित शर्माने 61 धावांची, शुभमन गिलने 51 धावांची आणि विराट कोहलीने 51 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 50 षटकात 4 बाद 410 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT