Virat Kohli Post Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Post: विराटचं सोशल मीडिया ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर? 'त्या' पोस्टने चर्चेला उधाण

विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Cryptic Instagram Story: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (7 जून) कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. पण या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली चर्चेचा विषय ठरला होता.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (8 जून) विराट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. त्यानंतर आता त्याने शुक्रवारी एक पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केली आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.

झाले असे की दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने वरच्या फळीतील विकेट्स झटपट गमावल्या होत्या. विराटही 14 धावांवर बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने बाद केले होते.

तसेच तो गुरुवारी ड्रेसिंग रुममध्ये भारतीय संघातील इतर सदस्यांसह काहीतरी खात असल्याचे दिसले होते. त्यामुळे त्याचा हा खातानाता फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक युजर्सने त्याला लवकर बाद होण्याबद्दल दु:ख नसल्याचे म्हटले होते.

यानंतर विराटने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी एक पोस्ट इंस्टाग्रामला शेअर केली होती. ही पोस्ट त्याने तो ट्रोल झाल्याने टाकली असल्याचा अंदाज अनेकांनी लावला. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये मार्क मॅन्सनच्या विधान आहे. ते विधान असे की 'इतर लोकांच्या मतांच्या तुरुंगातून स्वत:ला मुक्त करून घेण्यासाठी तुम्हाला नापसंत होण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.'

Virat Kohli Instagram Story

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या.  ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली.

भारताकडून मोहम्मद सिराजने 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर भारताने 38 षटकात 5 बाद 151 धावा केल्या आहेत. भारताने दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा (15), शुभमन गिल (13), चेतेश्वर पुजारा (14), विराट कोहली (14) आणि रविंद्र जडेजा (48) यांच्या विकेट्स गेल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT