विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म भारतीय निवड समिती आणि बीसीसीआयसाठी समस्या बनत आहे. खरं तर, यावर्षी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीचे फॉर्ममध्ये परतणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे तर आयपीएल 2022 व्यतिरिक्त, विराट कोहलीचा खराब फॉर्म इंग्लंड दौऱ्यावरही कायमच राहिला आहे. (virat kohli news)
विराट कोहलीला शेवटची संधी!
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, विराट कोहली तंदुरुस्त राहिल्यास तो टी-20 विश्वचषकाचा नक्कीच भाग घेईल, परंतु या अनुभवी खेळाडूसाठी ही शेवटची संधी असेल, कारण आम्हाला संघाला पुढेही खेळताना पाहायचे आहे. तो पुढे म्हणाला की जर विराट कोहली फॉर्ममध्ये परत येऊ शकला नाही तर त्याला देशांतर्गत खेळण्यास सांगितले जाणार आहे. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली मात्र, विराट कोहली संघात परतल्यावर किती काळानंतर फॉर्ममध्ये येईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोहलीने 12 महिन्यांत 23 सामने खेळले नाहीत
विशेष म्हणजे विराट कोहली गेल्या 3 वर्षांपासून शतक झळकावण्यात अपयशी ठरत आहे आणि त्याचबरोबर या खेळाडूला विश्रांती देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या 12 महिन्यांत विराट कोहली न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि केएल राहुलनंतर सर्वाधिक विश्रांती घेणारा खेळाडू आहे. अशाप्रकारे या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावरती आहे. आकडेवारीनुसार विराट कोहलीने 2021 च्या टी-20 विश्वचषकापासून 23 सामने खेळलेला नाही आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.