Virat Kohli - Haris Rauf Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: 'फक्त कोहली...कोहलीच...', विराटला पाहताच रौफने ऐकवली व्यथा

Virat Kohli - Haris Rauf: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी विराट कोहलीला हॅरिस रौफ भेटला होता, या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Virat Kohli meet Haris Rauf ahead of Asia Cup 2023 India vs Pakistan ODI Match Video Viral :

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषकातील सामना शनिवारी (2 सप्टेंबर) खेळवला जात आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे, पण असे असले तरी कँडीमध्ये होत असलेल्या या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंमध्ये भाईचारा दिसून आला आहे.

बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भेटले. यावेळी भारताचा स्टार फलंदाज विराट आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ यांची भेट चर्चेत राहिली.

याचे कारण म्हणजे एक वर्षापूर्वी म्हणजे टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत सुपर 12 फेरीत जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने आले होते, तेव्हा भारतीय संघाला 12 चेंडूत 31 धावांची गरज होती.

अशा परिस्थितीत विराटने हॅरिस रौफ विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दोन षटकार ठोकले होते. त्यामुळे सामन्याचे पारडे भारताकडे झुकले आणि भारताने हा सामना ४ विकेट्सने जिंकला. विराट त्यावेळी 53 चेंडूत 82 धावांवर नाबाद होता.

दरम्यान, सामन्यानंतर एकवर्षाने पुन्हा विराट आणि रौफ भेटले. यावेळी जेव्हा रौफने विराटला पाहिले, तेव्हाविराटच्या त्या दोन षटकारांमुळे चाहत्यांची काय रिऍक्शन असते, याबद्दलची व्यथा गमतीने सांगितले. तो विराटला म्हणाला, 'जिथे जिथे जातो ना, तिथे कोहली-कोहली ऐकतो.' हे ऐकून विराट हसतो.

इतकेच नाही, तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हे दोघेही एकमेकांना भेटले होते. यावेळी बाबर आझमने रोहितच्या कुटुंबाची विचारपूसही केली. यावेळी रोहितने त्याच्या मुलीची शाळा असल्याने ती त्याच्याबरोबर आली नसल्याचे सांगितले.

त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही रौफ भेटला. या दोघांमध्येही वेगवान गोलंदाजीबद्दल आणि खेळपट्टीबद्दल चर्चा झाली. या भेटींचा खास व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

दरम्यान, आशिया चषकात साखळी फेरीतील पाकिस्तानचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी नेपाळविरुद्ध 238 धावांनी विजय मिळवला होता. तथापि, भारताचा हा साखळी फेरीतील पहिलाच सामना आहे. या सामन्यातून भारतीय संघ आशिया चषकाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: कुठे बाजार बुडला, कुठे कोसळलं छत, हा पाऊस जाणार कधी? हवामान खात्याने दिली 'चांगली बातमी'

Dovorlim: दवर्लीत पुन्हा नाट्यमय घडामोड! सरपंचाविरोधातील अविश्‍वास ठराव बारगळला; भाजपला दणका

अग्रलेख: ज्या वाळूच्या साहाय्याने घरे उभारायची, त्याच वाळूसाठी 'जीव' घेतले जात आहेत..

Aaroshi Govekar: .. ऐसी धाकड है! गोव्याच्या 'आरोशी'ची भारतीय फुटबॉल संघात निवड; नेपाळविरुद्ध पदार्पणाची संधी

Dawood Associate Arrested In Goa: मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या माणसाला गोव्यात अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT