Rohit Sharma Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

विराट धावत आला अन् थेट रोहितला दिली 'जादू की झप्पी', IND vs SL सामन्यातील व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma - Virat Kohli: मंगळवारी आशिया चषकात झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मामधील ब्रोमान्स चर्चेचा विषय ठरला

Pranali Kodre

Virat Kohli Hugged Rohit Sharma during India vs Sri Lanka Asia Cup 2023 match:

मंगळवारी भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फेरीच्या सामन्यात 41 धावांनी विजय मिळवला. कोलंबोला झालेल्या या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघाने अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला आहे.

दरम्यान भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माचे योगदानही महत्त्वाचे ठरले. दरम्यान, या सामन्यातील आणखी एक घटना चर्चेत राहिली, ती म्हणजे विराट कोहलीने रोहितला मारलेली मिठी.

झाले असे की श्रीलंकेचा संघ भारताने दिलेल्या २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. यावेळी ७५ धावांच्या आतच श्रीलंकेने ५ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर कर्णधार दसून शनका आणि धनंजय डी सिल्वा हे श्रीलंकेचा सावरत होते. त्यांनी २६ धावांची भागीदारीही केली होती.

पण त्याचवेळी रविंद्र जडेजाने गोलंदाजी केलेल्या २६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शनकाने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे गेला. यावेळी स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहितने चपळाईने उजव्या बाजूला सूर मारत दोन्ही हातांनी जमिनीलगत झेल घेतला.

त्याने घेतलेला शानदार झेल पाहून भारतीय खेळाडूंनी विकेट मिळाल्याचा जल्लोष केला. याचवेळी विराटही धावत आला आणि त्याने झेल घेतलेल्या रोहितला कडकडून मिठी मारली. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच अनेक चाहत्यांना त्यांच्यातील हा ब्रोमान्स भावला आहे.

विराट - रोहितच्या जोडीचा विक्रम

याच सामन्यादरम्यान रोहित आणि विराट यांच्या जोडीने खास विक्रम केला आहे. या दोघांमध्ये या सामन्यात 16 चेंडूत केवळ 10 धावांची भागीदारी झाली होती. पण या भागीदारी दरम्यान वनडेत या दोघांच्या भागीदारीत 5000 धावा पूर्ण झाल्या.

या दोघांनी 86 डावात भागीदारी करताना 5000 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे त्यांची वनडेत भागीदारीमध्ये सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करणारी जोडी ठरली आहे.

त्यांनी गोर्डन ग्रिनीज आणि देडमंड हाइन्स यांच्या जोडीचा विक्रम मोडला आहे. ग्रिनीज आणि हाइन्स यांच्या जोडीने 97 वनडे डावात भागादीरी करताना 5000 धावांचा टप्पा पार केला होता.

रोहितचे अर्धशतक

या सामन्यात रोहितने अर्धशतकी खेळी करताना 48 चेंडूत 53 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. दरम्यान विराट मात्र ३ धावांवर बाद झाला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 49.1 षटकात 213 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 41.3 षटकात सर्वबाद 172 धावाच करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT