Virat Kohli

 

Dainik Gomantak 

क्रीडा

IND vs SA: विराट कोहली टीम इंडियातून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. नियमित कर्णधार असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

जोहान्सबर्गमध्ये होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. विराटला पाठीचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्याने माघार घेतली आहे. त्यामुळे त्याच्या जागी केएल राहुल (KL Rahul) कर्णधार असणार आहे.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोहलीच्या जागी हनुमा विहारीला स्थान देण्यात आले आहे. दुसऱ्या कसोटीसाठी भारताने फक्त एक बदल केला आहे. यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात दोन बदल करण्यात आले आहेत. क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Cock) जागी कार्ल व्रेन आणि ड्युएन ऑलिव्हरच्या जागी व्यान मुल्डरचा समावेश करण्यात आला आहे. सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीनंतर डी कॉक निवृत्त झाला. यामुळे यजमान संघाला जबरदस्तीने बदल करावा लागला. त्याचबरोबर गोलंदाजीला मजबूत करण्यासाठी डुआन ऑलिव्हर संघात स्थान देण्यात आले.

दरम्यान,सेंच्युरियनच्या मैदानावर भारताने आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. त्यांनी इथे पाच कसोटी सामने खेळले असून दोन जिंकले असून तीन अनिर्णित राहिले आहेत. सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीत भारताने एकतर्फी विजय मिळवला होता. टीम इंडियाने (Team India) हा सामना 113 धावांनी जिंकला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या कसोटीत विजयासह दक्षिण आफ्रिकेची सेंच्युरियन येथे सलग विजयांची मालिका संपवली.

भारताचा प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे-

केएल राहुल (कर्णधार), हनुमा विहारी, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन.

दक्षिण आफ्रिकेचा प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे आहे-

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, टेम्बा बावुमा, रेसी व्हॅन डर ड्यूसेन, कार्ल व्रेन, कागिसो रबाडा, मार्को यान्सन, लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हर, केशव महाराज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT