Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Instagram वर कोहलीचा 'विराट' विक्रम; एका पोस्टमधून करोडोंची कमाई

एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा विराट आशियाई सेलिब्रिटी बनला आहे.

दैनिक गोमन्तक

विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममधून जात आहे असे म्हणायला हरकत नाही. एकेकाळी जागतिक क्रिकेटमध्ये रन मशीन म्हणून ओळखला जाणारा कोहली आणि त्याचे चाहते आज चांगल्या खेळीसाठी आसुसलेला आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्टसाठी कोहली सुमारे 8.70 लाख रुपये घेतो आणि एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा विराट आशियाई सेलिब्रिटी बनला आहे. (Virat Kohli has become the highest paid Asian celebrity from Instagram posts)

होय, अलीकडेच hopperhq ने 2022 सालासाठी इंस्टाग्राम रिच लिस्ट जारी केली आणि या यादीत कोहलीला चार स्थानांचा फायदा झाला आहे. गेल्या वर्षी कोहलीने एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 5 कोटी रुपये घेतले आणि तो 18 व्या क्रमांकावरती होता, परंतु 2022 मध्ये तो चार स्थानांनी झेप घेत 14 व्या स्थानावरती पोहोचला आहे. जागतिक क्रीडा सेलिब्रिटींबद्दल बोलायचे झाले तर कोहलीचा क्रमांक क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीनंतर लागतो. रोनाल्डो एका पोस्टसाठी 19.17 कोटी घेतो, तर मेस्सीच्या पोस्टची किंमत 14.21 कोटी रुपये घेत आहे.

हॉपरहकने जाहीर केलेल्या यादीत भारतीयांबद्दल बोलायचे तर विराट कोहलीनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा नंबर लागतो. देसी गर्ल प्रति इंस्टाग्राम पोस्ट 3.38 कोटी रुपये घेते आणि या यादीत ती 27 व्या क्रमांकावरती आहे.

विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 200 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. एवढ्या जास्त संख्येने सोशल मीडियावर फॉलो केला जाणारा तो जगातील नंबर 1 क्रिकेटर आहे. जर आपण इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंबद्दल बोललो, तर क्रिस्टियानो रोनाल्डो 469 दशलक्षांसह शीर्षस्थानी आहे तर दुसरीकडे, लिओनेल मेस्सी 351 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावरती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

SCROLL FOR NEXT