Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: 'या' चुकीमुळे टीम इंडियाचं झालं मोठं नुकसान, विराट कोहलीला...

Virat Kohli: रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापनाने विराट कोहलीला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीला पाठवले.

दैनिक गोमन्तक

India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत त्याची एक चूक टीम इंडियाला चांगलीच महागात पडली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापनाने विराट कोहलीला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीला पाठवले आणि तो केवळ 5 धावा करुन बाद झाला.

दरम्यान, विराट कोहलीला सलामीला आणणे ही टीम इंडियाची सर्वात मोठी चूक ठरली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या वनडे दरम्यान दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला, त्यानंतर 'हिटमॅन'च्या जागी विराट कोहलीला सलामीसाठी मैदानात उतरवण्यात आले होते.

विराट कोहलीला सलामी द्यावी लागली

भारतीय संघ व्यवस्थापनाकडे केएल राहुललाही सलामीला घेण्याचा पर्याय होता, पण चांगल्या सुरुवातीच्या आशेने टीम इंडियाने विराट कोहलीला शिखर धवनसह सलामीला पाठवले. विराट कोहलीला सलामी मिळाल्यावर टीम इंडियाला नफ्याऐवजी तोटा सहन करावा लागला. टीम इंडियाला पहिला धक्का विराट कोहलीच्या रुपाने 7 धावांवर बसला. विराट कोहली 5 धावा करुन बाद झाला. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेनने कोहलीला बोल्ड करुन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

या चुकीमुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले

वास्तविक, विराट वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. विराट कोहलीला त्याच्या फलंदाजीच्या क्रमाशी छेडछाड अजिबात सहन होत नाही. अशा स्थितीत जेव्हा भारतीय संघ व्यवस्थापनाने कोहलीला तिसऱ्या क्रमांकावरुन उचलून सलामीला फलंदाजीसाठी पाठवले तेव्हा विराटची लय बिघडली. जेव्हा कोहलीच्या फलंदाजीच्या क्रमाशी छेडछाड करण्यात आली, तेव्हा या गोष्टीमुळे विराटचे लक्ष खेळावरुन हटले. याच कारणामुळे टीम इंडियाला चांगली सुरुवातही करता आली नाही.

रोहित शर्माच्या हातातून रक्तस्त्राव सुरु झाला

रोहित शर्माबद्दल सांगायचे झाल्यास, दुसऱ्या वनडेत कॅच घेताना तो जखमी झाला. डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने रोहित शर्माला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना मोहम्मद सिराजच्या डावातील दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित शर्माने अनामूल हकचा झेल सोडला. यादरम्यान त्याच्या डाव्या हातातून रक्तस्त्राव सुरु झाला. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT