IND vs BAN, 2nd ODI: दोन बदलांसह मैदानात उतरली टीम इंडिया, असे आहेत 'प्लेइंग इलेव्हन'

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मालिकेसाठी भारताने अंतिम 11 जणांच्या संघात दोन बदल केले आहेत.
Team India
Team India Dainik Gomantak
Published on
Updated on

IND vs BAN, 2nd ODI: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा वनडे सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारताने या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. अक्षर पटेल निवडीसाठी उपलब्ध झाल्याने त्याला शाहबाज अहमदच्या जागेवर अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली आहे. तसेच पहिल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला कुलदीप सेन दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर उमरान मलिकला संधी देण्यात आली आहे.

कुलदीप सेनला पहिल्या वनडेनंतर पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवत होता. त्याच कारणामुळे तो दुसऱ्या वनडेला मुकला आहे.

Team India
Team India: पाकिस्तानचा पराभव होताच भारताला झाला मोठा फायदा, कसा ते जाणून घ्या

तसेच बांगलादेशने अंतिम 11 जणांच्या संघात हसन मेहमुदच्या जागेवर नसुम अहमद याला संधी दिली आहे.

भारतीय संघ या वनडे मालिकेत 0-1 फरकाने मागे आहे. भारताने पहिला वनडे सामना केवळ एका विकेटने गमावला होता. त्यामुळे मालिकेतील आव्हान आता राखण्यासाठी भारताला विजयाची आवश्यकता आहे. तर बांगलादेश दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल.

दुसऱ्या वनडेसाठी असे आहेत 11 जणांचे संघ -

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

बांगलादेश - नजमुल हुसेन शांतो, लिटन दास (कर्णधार), अनामुल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com