Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli Deepfake: सचिन नंतर आता किंग कोहली डीपफेकचा शिकार; व्हिडिओ व्हायरल

Manish Jadhav

Virat Kohli Deepfake Victim: सध्या केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर क्रीडा जगतातही डीपफेक व्हिडिओंवरुन सतत वाद सुरु आहेत. सर्वात आधी बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधाना हिच्या व्हिडिओवरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर क्रिकेटचा भगवान सचिन तेंडुलकरही यात अडकला. आता विराट कोहलीचे ताजे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी (20 फेब्रुवारी रोजी) विराट कोहलीचा व्हिडिओ एका वृत्तवाहिनीच्या क्लिपसह सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या व्हिडिओमध्ये, विराट कोहलीच्या लिप-सिंकिंगशी छेडछाड करुन दुसऱ्या मुलाखतीचे मॉर्फिंग केले गेले आणि विराटसारखा अन्य आवाज वापरुन त्याचा प्रचार केला गेला.

डीपफेकचा बळी कोण ठरले?

अलीकडेच, दोन दिवसांपूर्वी, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन या बॉलिवूड सेलिब्रिटींचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता विराट कोहलीचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे, ज्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सचिन तेंडुलकरने गेल्या महिन्यातच याची माहिती दिली होती आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. आता विराटच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

सचिन तेंडुलकरने संताप व्यक्त केला होता

यापूर्वी, सचिन तेंडुलकरच्या एका मुलाखतीच्या व्हिडिओमध्येही अशाच प्रकारे छेडछाड करण्यात आली होती. यानंतर सचिनने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनीही यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. असाच काहीसा प्रकार विराटच्या बाबतीत घडला आहे. एका ऑनलाइन ट्रेडिंग ॲपने विराटच्या इंटरव्यूशी छेडछाड केली आणि त्याच्या आवाजात स्वतःचे शब्द तयार करुन डुप्लिकेट व्हॉईस ओव्हर केला. यामध्ये विराट या ॲपचं प्रमोशन करत असल्याचं दिसत होतं. मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे फेक होता.

विराट टीम इंडियातून ब्रेकवर आहे

सध्या विराट कोहली टीम इंडियातून ब्रेकवर आहे. कौटुंबिक कारणामुळे त्याने विश्रांती घेतली आहे. तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. मार्चच्या अखेरीस सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 मध्ये तो पुनरागमन करेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी विराटचा खास मित्र एबी डिव्हिलियर्सने सांगितले होते की, तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. मात्र, काही दिवसांनंतर एबीने स्वतःच आपले म्हणणे मागे घेतले होते. आता गेल्या एक महिन्यापासून सोशल मीडियापासून दूर असलेला विराट यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहावं लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today News Live: कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी अखेर खूनाचा गुन्हा नोंद

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Stray Dogs In Goa: भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले; किनारे बनले असुरक्षित

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

SCROLL FOR NEXT