Virat Kohli, Marnus Labuschagne, Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: उकाड्याने हैराण झालेल्या स्मिथ शेजारी विराटचा कल्ला, व्हिडिओ एकदा पाहाच

Virat Kohli Video: राजकोट वनडेदरम्यान स्टीव्ह स्मिथ उकाड्याने हैराण झालेला असताना विराट लॅब्युशेनची मजा घेताना दिसला.

Pranali Kodre

Virat Kohli dance in front of Marnus Labuschagne while Steve Smith beating Heat during India vs Australia 3rd ODI at Rajkot :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी20 सामना बुधवारी (27 सप्टेंबर) झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 66 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यादरम्यान एक गमतीशीर घटनाही पाहायला मिळाली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी 78 धावांची सलामी देत चांगली सुरुवात दिली. मात्र अर्धशतकानंतर वॉर्नर 53 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी 137 धावांची भागीदारी केली.

परंतु, मार्श 96 धावांवर बाद झाला. याचवेळी स्मिथनेही अर्धशतक पूर्ण केले होते आणि तो 61 धावांवर खेळत होता. मात्र वातावरणात उष्णता असल्याने त्याचा त्रास स्मिथला होत होता. यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडू ड्रिंक्स ब्रेकवेळी पाणी घेऊन आले, तेव्हा स्मिथसाठी खुर्चीही आणण्यात आली.

स्मिथ उष्णतेचा त्रास दूर करण्यासाठी आईस पॅक डोक्यावरही लावत असल्याचे दिसून आले, तसेच तो खुर्चीवर बसून काहीतरी पीत असल्याचेही दिसले. त्याचदरम्यान, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला मार्नस लॅब्युशेनही तिथे आला, तेव्हा त्याचे विराटबरोबर काहीतरी संभाषण सुरू होते.

याचदरम्यान, अचानक विराट लॅब्युशेनसमोर जाऊन नाचायला लागला आणि त्याच्या पोटात पोक करू लागला. ही घटना चाहत्यांना गमतीशीर वाटली. या घटनेचा व्हिडिओ देखील बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास स्मिथ 74 धावांवर बाद झाला. तसेच लॅब्युशेनने 72 धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 352 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. 

त्यानंतर 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 49.4 षटकात 286 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 81 धावा केल्या, तसेच विराट कोहलीने 56 धावांची खेळी केली, तर श्रेयस अय्यरने 48 धावांची खेळी केली. बाकी कोणाला फार काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: हॉटेल, रेल्वे, रस्ते... सर्वत्र ट्रॅकिंग! गोव्यात 'चोरांचा माग' काढण्यासाठी 'रियल-टाईम' प्रणाली आवश्यक

125 वर्षांची कोकणी कला लंडनमध्ये! वर्षा उसगावकर यांनी सादर केलं 'तियात्र'; Video Viral

अग्रलेख: 'घर घर मे दिवाली है, मेरे घर मे अंधेरा' गोमंतकीय सिनेकर्मींची अवस्था

Goa Beach Wedding: परवानगी नसताना घातला मांडव, बीच वेडिंगच्या नादात 1 लाखांचा दंड, गोव्यात घडला अजब प्रकार; वाचा

'अवामी लीग'ला नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र! हसीनांच्या मृत्युदंडामागे राजकीय सूड? - संपादकीय

SCROLL FOR NEXT