Anushka Sharma| virat kohli |Vaamika
Anushka Sharma| virat kohli |Vaamika Dainik Gomantak
क्रीडा

Virat - Anushka: विरुष्काची वृदांवननंतर हृषीकेश वारी, IND vs AUS सिरीजपूर्वी 'या' आश्रमला दिली भेट

Pranali Kodre

Virat Kohli - Anushka Sharma: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची फॅन फॉलोविंग जबदस्त आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दलही जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यामुळे ते कुठेही गेले तरी त्यांचे फोटो-व्हिडिओ व्हायरल होतात.

नुकतेच विराट आणि अनुष्का त्यांची मुलगी वामिकासह फिरायला गेले आहेत. याचदरम्यान विराट आणि अनुष्काने हृषीकेशमधील स्वामी दयानंद गिरी आश्रमालही भेट दिली. यादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तसेच अनेक चाहते असेही म्हणत आहेत की स्वामी दयानंद जी महाराज समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आता विराटला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत यश मिळेल.

यापूर्वीही विराट आणि अनुष्का यांनी वामिकासह वृदांवनमधील नीम करोली बाबा आश्रमाला भेट दिली होती. त्यांनी त्या भेटीत श्री परमानंद जी यांचे आशीर्वादही घेतले होते. त्यानंतर विराटने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दोन शतकांसह चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे तेव्हाही अनेक चाहत्यांनी त्याच्या कामगिरीमागे त्याच्या वृंदावन भेटीला श्रेय दिले होते.

दरम्यान, हृषीकेशमध्ये विराटला काही चाहत्यांनी सेल्फीसाठीही मागणी केली. तसेच असेही समजत आहे की विराट आणि अनुष्का काही धार्मिक विधींमध्येही सहभागी झाले होते.

(Virat Kohli and Anushka Sharma visit to Rishikesh's Swami Dayanand Giri Ashram)

विराट सध्या विश्रांतीवर

सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा, केएल राहुल यांच्यासह विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे.

त्यामुळे आता हे क्रिकेटपटू 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूरला होणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 17 - 21 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीला होईल. तिसरा कसोटी सामना 1-5 मार्चदरम्यान धरमशाला आणि चौथा कसोटी सामना 9-13 मार्चदरम्यान अहमदाबादला होईल.

या कसोटी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 17 ते 22 मार्च दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT