Ajinkya Rahane | Yashswi Jaiswal  Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: 'बाहेर जा!' रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना जयस्वालला मिळाली होती शिक्षा; व्हिडिओ पुन्हा चर्चेत

Yashasvi Jaiswal: या व्हिडीओमध्ये अजिंक्य राहणे गैरवर्तणुकीबद्दल यशस्वी जयस्वाल याला समज देताना दिसतोय

Akshata Chhatre

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमधला युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने अलीकडेच मुंबईचा संघ सोडून गोव्याचा संघ निवडण्याची भूमिका घेतली. यानंतर यशस्वी जयस्वाल बराच चर्चेचा विषय ठरलाय. याच प्रशवभूमीवर सध्या अजिंक्य राहणे आणि यशस्वी जयस्वाल यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल व्हायला सुरूवात झालीये, या व्हिडीओमध्ये अजिंक्य राहणे गैरवर्तणुकीबद्दल यशस्वी जयस्वाल याला समज देताना दिसतोय.

तर २०२२ च्या दुलीप ट्रॉफी फायनलमधील एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच फिरायला सुरुवात झालीये. पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यातील अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवसातील हा व्हिडिओ आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या २० वर्षीय जयस्वालला आक्रमक 'स्लेजिंग'मुळे पंचांनी अनेकदा समज दिली होती.

यशस्वी जयस्वाल याचे प्रमुख लक्ष टी रवी तेजा होता. ५० व्या षटकादरम्यान जयस्वाल आणि तेजा यांच्यात बाचाबाची झाली, ज्यामुळे रहाणे आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला. रहाणेने शांत करण्याचा प्रयत्न करूनही जयस्वालचे शाब्दिक हल्ले सुरूच राहिले. यानंतर अजिंक्य रहाणे याने यशस्वी जयस्वालला मैदानाच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला होता. जयस्वाल नाराजी व्यक्त करत मैदानाबाहेर गेला आणि ६५ व्या षटकात त्याला पुन्हा खेळण्याची परवानगी मिळाली होती.

गोव्यासाठी 'यशस्वी' टर्निंग पॉईंट

जयस्वालचा हा निर्णय गोवा क्रिकेट असोसिएशनसाठी (GCA) एक मोठे यश मानले जात आहे. GCA चे माजी सचिव रोहन देसाई यांनी याला संघासाठी 'टर्निंग पॉइंट' म्हटले आहे. नुकतीच रणजी ट्रॉफीच्या एलिट गटात बढती मिळालेला गोवा संघ आता जयस्वालच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, अशी शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT