Cricket Club Dainik gomantak
क्रीडा

विजय क्रिकेट क्लबची रुद्रेश्वर युवक संघावर मात

प्रथम फलंदाजी करताना विजय क्लबने 7 बाद 263 धावा केल्या

दैनिक गोमन्तक

पणजी : कौशल हट्टंगडीचे नाबाद शतक, तसेच अमित यादव व किथ पिंटो यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर विजय क्रिकेट (Cricket) क्लबने 40 व्या नंदा लोलयेकर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सामना एकतर्फी जिंकला. त्यांनी रुद्रेश्वर युवक संघावर 183 धावांनी मात केली.

माशे क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेतील सामना रविवारी माशे-काणकोण येथील निराकार मैदानावर झाला. कौशलने आक्रमक फलंदाजी करताना 65 चेंडूंत नाबाद 110 धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना विजय क्लबने 7 बाद 263 धावा केल्या. त्यांच्या डावात महत्त्वपूर्ण योगदान देताना शशांक वेरेकर (46) व वैभव नाईक (41) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. नंतर अमित यादव (5-31) व किथ पिंटो (4-13) यांनी रुद्रेश्वर युवक संघाचा डाव 80 धावांत गुंडाळून संघाला मोठा विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक ः विजय क्रिकेट क्लब ः 35 षटकांत 7 बाद 263 (कौशल हट्टंगडी नाबाद 110, शशांक वेरेकर 46, वैभव नाईक 41, झीशान हाश्मी 2-51, आनंद माजाळीकर 1-41, प्रथमेश नाईक 2-35, पुंडलिक नाईक 1-43) वि. वि. रुद्रेश्वर युवक संघ ः सर्वबाद 80 (आनंद माजाळीकर 19, झीशान हाश्मी 16, अमित यादव 5-31, किथ पिंटो 4-13).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: ''...तर मग भारताचं ऑपरेशन सिंदूर कसं चुकीचं?" मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी लष्कराला दिला घरचा आहेर

Viral Video: रेल्वे प्रवासात 'फ्री स्टाईल' हाणामारी! प्रवाशांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं; जीव वाचवण्यासाठी मुलींची पळापळ

Temba Bavuma: 'मैदानावर जे घडलं ते मी विसरत नाही...' बुमराह-पंतने मागितली माफी; टेंबा बावुमाचा टीम इंडियाबाबत मोठा खुलासा VIDEO

बॉडी कॅमेऱ्याशिवाय 'तालांव' फाडता येणार नाही; पोलिसांच्या गणवेशावर 'तिसरा डोळा', संवाद होणार कॅमेऱ्यात कैद!

Goa Live Updates: वडामळ-भांडोलमध्ये आयटीआय आणि ग्रंथालयाची मागणी

SCROLL FOR NEXT