Jason Roy Clean Bowled Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: भन्नाट शॉट खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू थेट स्टंपवर! ओव्हरकॉन्फिडन्समुळे जेसन रॉय क्लीन बोल्ड; व्हिडिओ होतोय व्हायरल

Jason Roy Clean Bowled: टी-20 क्रिकेटमुळे फलंदाजांच्या खेळण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे.

Sameer Amunekar

टी-20 क्रिकेटमुळे फलंदाजांच्या खेळण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आक्रमक फलंदाजी करताना क्रिकेटपटू आता पारंपरिक फटक्यांबरोबरच अनेक अनोखे आणि धाडसी शॉट्स खेळताना दिसतात. मात्र काही वेळा असा प्रयोग फलंदाजासाठीच महागात पडतो. असाच एक भन्नाट प्रकार युरोपियन टी-20 प्रीमियर लीगच्या सामन्यात पाहायला मिळाला.

ग्लासगो कॉस्मिक आणि डबलिन गार्डियंस यांच्यात 29 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जेसन रॉयने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र त्याची विकेट ज्या पद्धतीने पडली, त्याची सध्या क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. अनोखा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि रॉयला मैदान सोडावे लागले.

60 धावांवर जेसन रॉयचा आऊट

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर ग्लासगो कॉस्मिकने प्रथम फलंदाजी केली. संघाकडून कर्णधार जॉर्ज मुंसी आणि जेसन रॉय यांनी डावाची सुरुवात केली. रॉयने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत डबलिनच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

त्याने अवघ्या 36 चेंडूंमध्ये 60 धावांचा टप्पा गाठला होता. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र डावाच्या 16व्या षटकात घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भन्नाट शॉट खेळण्याचा प्रयत्न ठरला महाग

वेगवान गोलंदाज मॅथ्यू होलार्डच्या षटकातील एका चेंडूवर रॉयने वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विकेटच्या मागच्या बाजूने हटून फाइन लेगच्या दिशेने शॉट मारण्याचा त्याचा प्रयत्न होता.

मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नाही. चेंडू बॅटला लागल्यानंतर अनपेक्षित दिशेने परत गेला आणि थेट स्टंपच्या वरच्या भागावर आदळला. त्यामुळे जेसन रॉय बोल्ड झाला. शानदार खेळी करत असतानाही अशा विचित्र पद्धतीने विकेट गमावल्याने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ग्लासगो कॉस्मिकची दमदार फलंदाजी

जेसन रॉयच्या 60 धावांच्या खेळीच्या जोरावर ग्लासगो कॉस्मिकने निर्धारित 20 षटकांत 5 विकेट गमावत 183 धावा केल्या. डबलिन गार्डियंससमोर विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

मात्र ग्लासगोच्या गोलंदाजांनी लक्ष्याचा बचाव करत डबलिनच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही.

33 धावांनी ग्लासगोचा विजय

184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डबलिन गार्डियंसचा संघ 19.3 षटकांत 150 धावांवर सर्वबाद झाला. परिणामी ग्लासगो कॉस्मिकने हा सामना 33 धावांनी जिंकला.

ग्लासगोच्या विजयात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 4 षटकांत केवळ 21 धावा देत तब्बल 4 विकेट घेतल्या. त्याला पॉल व्हॅन मीकेरेननेही उत्तम साथ दिली आणि त्याने 3 फलंदाजांना बाद केले.

या विजयासह ग्लासगो कॉस्मिकने स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला. मात्र संघाच्या विजयाइतकीच जेसन रॉयच्या विचित्र पद्धतीने झालेल्या आऊटची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो सावधान! 'या' 3 कारणांमुळे अडकू शकतो 2,000 रुपयांचा हप्ता

Nepal Flood: चिखलाचा लोंढा, घरांचा ढिगारा अन् मृत्यू समोर; 97 वर्षीय गुणा माया बोहरांनी हार मानली नाही, चार तासांनी सुखरूप बाहेर

Goa Crime: दोन्ही भाडोत्री मारेकरी अजून फरार; नायक गोळीबारप्रकरणी 24 तासांनंतरही धागेदोरे सापडेनात

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वार्षिक वेतनवाढ दुप्पट करण्याचा प्रस्ताव, इन्क्रिमेंट 3 टक्क्यांवरून थेट 6 टक्के

Horoscope: रविवारी सूर्यदेवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींना अनपेक्षित धनलाभाचे योग, अनेक दिवसांपासून अडकलेली कामेही मार्गी लागणार

SCROLL FOR NEXT