Suryakumar Yadav and Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: तिलक वर्माच्या 'त्या' खुलास्यावर सूर्या म्हणतोय, 'मी स्वत:लाच उल्लू बनवलं...'

Pranali Kodre

Suryakumar Yadav Funny reply to Tilak Varma:

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात तिसरा टी20 सामना गयानाला मंगळवारी पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले. भारताच्या या विजयात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मोलाचा वाटा उचलला. या विजयानंतर या दोघांच्या संवादाचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

वेस्ट इंडिजने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल झटपट बाद झाल्यानंतर तिलक आणि सूर्यकुमार यांनी भारताचा डाव सावरला होता. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करत भारतासाठी विजयाचा मार्ग सोपा केला.

सूर्यकुमार 44 चेंडूत 83 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर तिलकने कर्णधार हार्दिक पंड्याबरोबर नाबाद 43 धावांची भागीदारी करत संघाला सामना जिंकून दिला. तिलक 49 धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान, या सामन्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी संवाद साधला. यावेळी तिलकने सूर्यकुमारबाबत एक खुलासा केला, त्यानंतर सूर्यकुमारनेही उत्तरे दिली.

बीसीसीआयने वेबसाईटला पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिलकने सांगितले की 'मला पल्बिकला एक गोष्ट सांगायची आहे. सूर्यकुमार यादवने त्याच्या व्रिस्टबँडवर लिहिले होते की तो त्याची खेळी स्थिर होऊन खेळेल. पण मला समजले नाही की त्याने पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटका का मारायला सुरुवात केली.'

त्यानंतर सूर्यकुमार म्हणाला, 'कधी कधी स्वत:शीही खोटं बोलणं चांगलं असते, मी स्वत:लाच उल्लू बनवले आणि पहिल्या चेंडूपासून शॉट मारण्यास सुरुवात केली. जेव्हा मी पहिले दोन चेंडू खेळलो, तेव्हा मी स्वत:ला सांगितले की नैसर्गिक खेळ करू. जोखीम घेऊन काही वेगळे करण्यात काही अर्थ नाही.'

दरम्यान, सूर्यकुमारने पत्रकार परिषदेवेळीही तिलकचे कौतुक केले होते. तो म्हणलेला, 'तिलकने कमालीची परिपक्वता दाखवली आहे. तो जेव्हा फलंदाजीला येतो, तेव्हा तो त्याचा खेळ खूप चांगल्याप्रकारे जाणतो की त्याला काय करायचे आहे आणि त्याला काय करायचे होते.'

'त्याची मानसिकताही खूप मजबूत आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. जेव्हा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये तुम्ही येता, तेव्हा तुम्हाला याची सर्वात जास्त गरज असते.'

तो पुढे म्हणाला, 'तिलक खराखुरा स्टार खेळाडू आहे. या स्तरावर आल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी परिपक्वता दाखवली आहे, ती शानदार आहे. त्याच्या यशामागे त्याची कठोर मेहनत आहे.'

सूर्यकुमार आणि तिलक यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळले आहेत.

तिलकने सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 मालिकेतूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात 22 चेंडूत 39 धावा केल्या होत्या, तसेच दुसऱ्या सामन्यात त्याने 41 चेंडूत 51 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील करासवाडा येथील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

Professional League 2024: स्पोर्टिंग क्लबचा एफसी गोवाला धक्का! स्पर्धेतील सलग तिसरा विजय

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

SCROLL FOR NEXT