क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये काही रेकॉर्ड केले जातात आणि मोडलेही जातात. यामध्ये फलंदाजी, गोलंदाजीपासून क्षेत्ररक्षणापर्यंत काहीतरी नवीन नक्कीच पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानावरही अशा अनेक घटना घडतात, ज्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरता येणार नाही. युरोपियन क्रिकेट फनी व्हिडिओमध्ये अशी एक घटना आहे जी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मजेदार क्षेत्ररक्षण मानली जात आहे. (European cricket Funny Video)
या व्हिडिओमध्ये फलंदाज एकाच चेंडूवर तीन धावा घेताना दिसत आहेत. मात्र, त्याच चेंडूवर वाइडसह संघाला चार धावा मिळतात. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की क्षेत्ररक्षकाने धावबाद होण्याच्या एक नव्हे तर चार संधी गमावल्या आहेत. सोशल मीडियावर जो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तो युरोपियन क्रिकेटच्या सामन्याचा आहे.
हा सामना प्रागमध्ये विनोहराडी आणि प्राग बार्बेरियन्स यांच्यात खेळला गेला होता त्याचीच ही व्हिडिओ क्लिप आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या माहितीनुसार, फलंदाज पुढे जाऊन शॉट मारण्याचा प्रयत्न करतो, पण तो शॉट खेळणे चुकतो. यष्टिरक्षक स्टंपकडे वेगाने धावतो, परंतु चेंडू पकडण्यास चुकतो, त्याचवेळी फलंदाज धाव घेण्यासाठी धावतात. दरम्यान, यष्टिरक्षक चेंडू उचलतो आणि दुसऱ्या टोकाला धावबाद होण्यासाठी फेकतो, पण गोलंदाजाचा चेंडू चुकतो, या दरम्यान फलंदाज दुसरी धाव पूर्ण करतो.
गोलंदाज धावत येऊन चेंडू यष्टिरक्षकाकडे फेकतो, पण पुन्हा यष्टिरक्षक चेंडू पकडण्यात अपयशी ठरतो. दरम्यान, बॅटर धावतो आणि तिसरी धाव पूर्ण करतो. शेवटी अंपायरने वाईडचा संकेत दिल्याने संघाला 4 धावा मिळतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकं व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हा व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमींना हसू आवरत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.