WPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: पहिल्या महिला आयपीएलचा मॉस्कॉट पाहिला का? BCCI ने शेअर केला खास Video

महिला प्रीमियर लीगचे उद्घाटन ४ मार्चपासून पहिला हंगाम सुरू होणार आहे.

Puja Bonkile

WPL 2023: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी वुमन प्रीमियर लीगच्या 'शक्ती' या मॉस्कॉटचे अनावरण केले. एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. वुमन प्रीमियर लीगच्या पहिला हंगामाला  4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सलामीचा सामना खेळला जाणार आहे.

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स हे पाच संघ खेळणार आहेत. दरम्यान या हंगामाला 4 मार्चपासून सुरूवात होणार आहे.

डब्ल्यूपीएलमध्ये 23 दिवसात एकूण 22 सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील 20 सामने साखळी फेरीत पार पडतील. तर एक एलिमिनेटर आणि अंतिम सामना असे प्लेऑफचे 2 सामने असतील. गे सर्व सामने मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर मिळून पार पडणार आहेत. दोन्ही स्टेडियमवर प्रत्येकी 11 सामने खेळवले जाणार आहेत.

तसेच एकूण 4 डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) पार पडणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तसेच दुसरा सामना 7.30 वाजता सुरू होईल.

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स हे पाच संघ खेळणार आहेत. या हंगामाला 4 मार्चपासून सुरूवात होणार आहे.

स्मृती मानधना ही महिला प्रीमियर लीग लिलावात विकली जाणारी पहिली खेळाडू ठरली आहे. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 3.4 कोटी रुपयांना विकले गेले आहे. ती केवळ पहिलीच खेळाडू नाही तर उद्घाटन डब्ल्यूपीएल लिलावात ती सर्वात महागडी खेळाडू देखील ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

Goa Politics: काँग्रेस युतीस तयार; जागांबाबत विजय, मनोजशी लवकरच चर्चा; गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माहिती

T20 World Cup 2026 मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी आणि कुठे होणार हाय-व्होल्टेज सामना? मोठी अपडेट आली समोर

Goa Live News:चावडी-काणकोणमध्ये ज्वेलरी दुकानात चोरीचा प्रयत्न; पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक!

SCROLL FOR NEXT