दिवाळखोरीशी संबंधित गुन्ह्यासाठी दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकरला शुक्रवारी अडीच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तीन वेळचा विम्बल्डन विजेता बोरिस बेकर (Boris Baker) या महिन्याच्या सुरुवातीला दिवाळखोरी प्रकरणात चार आरोपांमध्ये दोषी आढळला होता. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश डेबोरा टेलर यांनी ही शिक्षा सुनावली. जून 2017 मध्ये दिवाळखोर घोषित केल्यानंतर हजारो डॉलर्सचा निधी हस्तांतरित करताना बोरिस बेकरला पकडण्यात आले होते. (Veteran tennis player Boris Baker has been sentenced to two and a half years in prison for bankruptcy offences)
दरम्यान, बेकरला जर्मनीतील (Germany) आपली मालमत्ता जाहीर न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. यासोबतच त्याने 825,000 युरोचे कर्ज आणि एका टेक फर्ममधील शेअर्सची माहितीही लपवून ठेवली होती.
बेकरने गुन्हा स्वीकारला नाही
सहा वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या बेकरने त्याच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान, वकील रेबेका म्हणाले की, बेकरने ही संपत्ती जाणूनबुजून लपवली. तो अजूनही इतरांवर आरोप करत आहे. दुसरीकडे, बेकरचे वकील जोनाथन लाडलॉ यांनी त्याचा बचाव करताना सांगितले की, बेकरने हा पैसा विलासी जीवन जगण्यासाठी खर्च केला नाही. त्याने हा खर्च व्यवसायावर खर्च केला आहे. त्याने न्यायालयाला सांगितले की, आपल्याला सामाजिक अपमानाचा सामना करावा लागला असून भविष्यात कमाईची शक्यता नाही.
नेमकं प्रकरण
बेकरने 2013 मध्ये एका खाजगी बँकेकडून सुमारे 4.6 दशलक्ष युरोचे कर्ज घेतले. यासोबतच त्याने ब्रिटीश व्यावसायिकाकडून 1.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सही कर्ज घेतले होते. सुनावणीदरम्यान, बेकरने सांगितले की, माझी US$ 50 दशलक्षची कमाई घटस्फोट आणि निवृत्तीनंतर संपली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.