Venkatesh Prasad | India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

'काय चेष्टा लावली?' IND vs PAK मॅचसाठी राखीव दिवस ठेवल्याने व्यंकटेश प्रसादने आयोजकांनाच धरलं धारेवर

Venkatesh Prasad on Asia Cup 2023: आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आल्याबद्दल वेंकटेश प्रसादने खडेबोल सुनावले आहेत.

Pranali Kodre

Venkatesh Prasad questions the decision of reserve day for only India vs Pakistan Asia Cup 2023 Super Four match:

आशिया चषक 2023 स्पर्धा सध्या सुरू असून सुपर फोरच्या फेरीतील सामने खेळले जात आहेत. सुपर फोरमधील एकच सामना पूर्ण झाला असून आता उर्वरित सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार आहे. पण कोलंबोमध्ये येत्या आठवड्याभरात पावसाचे सावट असल्याने सामन्यांच्या पूर्ण होण्यावरही संकट आहे.

अशातच, स्पर्धा सुरू असतानाच अचानक शुक्रवारी (8 सप्टेंबर) भारत - पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवसाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने खडेबोल सुनावले आहेत. त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डांनाही प्रश्न विचारले आहेत.

या स्पर्धेत 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी याआधीच राखीव दिवस ठेवण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुपर फोरमधील सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुपर फोरमध्ये भारत - पाकिस्तान सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, या कारणामुळे अनेक क्रिकेट प्रेमींनी बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट संघावर हा अन्याय असल्याचे मत मांडले. कारण त्यांच्या सामन्यांवरही पावसाचे सावट असूनही त्यांच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

याचबाबत एका युजरच्या ट्वीटला उत्तर देताना प्रसादने तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. त्याने असेही म्हटले की धूर्त हेतू पूर्ण होऊ नये.

त्याने ट्वीट केले की 'जर हे खरे असेल, तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आयोजकांनी स्पर्धेची चेष्टा केली असून दोन संघांसाठी वेगळे नियम असल्याने या स्पर्धेला अनैतिक ठरवले आहे. न्याय तेव्हाच होईल, जेव्हा पहिला दिवशी खेळ न होता दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस होईल आणि हे दुष्ट हेतू यशस्वी होणार नाहीत.'

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवल्यानंतर काहीवेळातच बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डांनी हा निर्णय त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला असल्याची आणि त्यांची या निर्णयाला काही हरकत नसल्याची माहिती ट्वीट करत दिली. त्यावरही प्रसादने प्रतिक्रिया देत प्रश्न विचारले.

त्याने बांगलादेश क्रिकेटच्या ट्वीटला उत्तर देताना लिहिले की 'अशी अवास्तव मागणी मान्य करण्यासारखा कोणता दबाव होता.'

त्याचबरोबर श्रीलंका क्रिकेटच्या ट्वीटला उत्तर देताना प्रसादने लिहिले, 'जर तुमच्या स्वत:च्या सामन्यांसाठी राखीव दिवस मिळत नसेल, तर अशी अवास्तव मागणी मान्य करण्यासारखा कोणता दबाव होता?'

'आपल्याच संघाला पुढे जाण्याच्या संधीची किंमत मोजावी लागणार असताना भारत - पाकिस्तान सामना रद्द न होण्यासाठी इतकी उदारता का दाखवली जावी. तुम्ही तुमची यामागील खरे हेतू आणि कारण स्पष्ट करू शकता का?'

दरम्यान, सुपर फोरमध्ये केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचे कारण यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून किंवा आशियाई क्रिकेट संघटनेकडूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

सुपर फोरमध्ये अ गटातून भारत आणि पाकिस्तान संघांनी सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. तसेच ब गटातून श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: गोव्यातील फसवणूक प्रकरणात सिंगापूरच्या रहिवाशाला अटक!

SCROLL FOR NEXT