Vanindu Hasaranga Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: श्रीलंकेला मोठा धक्का, हा मिस्ट्री स्पिनर T20 मालिकेला मुकणार

मिस्ट्री स्पिनर वनिंदू हसरंगा (Vanindu Hasaranga) याला T20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. तो अद्याप ऑस्ट्रेलियाहून परतला नाही.

दैनिक गोमन्तक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना उद्या लखनऊच्या एकना स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वीच श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मिस्ट्री स्पिनर वनिंदू हसरंगा (Vanindu Hasaranga) याला T20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. तो अद्याप ऑस्ट्रेलियाहून परतला नाही. (Vanindu Hasaranga Will Not Be Present In The T20 Series Against India)

ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर हसरंगाला संसर्ग झाला होता

वास्तविक, श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ या महिन्यात पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दौऱ्यावर गेला होता. या दरम्यान हसरंगा कोरोना संक्रमित झाला होता. यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामनेही खेळू शकला नव्हता. हसरंगाला लगेचच मेलबर्नमधील कॅनबेरा येथून वेगळे करण्यात आले. श्रीलंकेचे उर्वरित खेळाडू मालिकेनंतर परतले, पण हसरंगा मेलबर्नमध्येच राहिला.

हसरंगाला मंगळवारी पुन्हा कोरोनाची लागण झाली

ऑस्ट्रेलियातून बाहेर पडण्यासाठी हसरंगाचा अहवाल निगेटिव्ह आणावा लागला होता, मात्र मंगळवारी झालेल्या चाचणीनंतर त्याचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. 15 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा हरसांगाला कोरोनाची लागण झाली होती.

हसरंगाची अनुपस्थिती श्रीलंकेसाठी मोठा धक्का

हसरंगाच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. 2021 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात शेवटच्या वेळी सामना झाला तेव्हा हसरंगाने 2-1 च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू होता. त्याने तीन सामन्यांत एकूण सात विकेट घेतल्या होत्या. यंदाच्या आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही हसरंगाला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

भारत आणि श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला T20 सामना 24 फेब्रुवारीला लखनऊमध्ये होणार आहे. यानंतर 26 आणि 27 फेब्रुवारीला धर्मशालामध्ये दोन टी-20 सामने खेळवले जातील. मोहालीत कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना 4 मार्च ते 8 मार्च या कालावधीत होणार आहे. यानंतर दुसरी आणि अंतिम कसोटी 12 ते 16 मार्च दरम्यान बेंगळुरु येथे होणार आहे.

T20I मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ: दासुन शनाका (Captain), पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ अस्लंका, दिनेश चंडीमल, दानुष्का गुनाथिलका, कामिल मिश्रा, जेनिथ लियानेज, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, लाहिरू कुमारो, फेरनंद कुमारो, फेरनंद बिनिश, फेरनंद जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रम, आशियान डॅनियल्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT