Vaibhav Suryavanshi Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: आयपीएलच्या रणसंग्रामापूर्वी वैभव सूर्यवंशीचा ट्रेलर! मारला असा खणखणीत षटकार की पाण्याचा पाईपच फुटला; व्हिडिओ व्हायरल

Vaibhav Suryavanshi Viral Video: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19व्या हंगामाला अद्याप बराच अवधी असला तरी, अनेक संघांनी आतापासूनच सरावाला सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

Vaibhav Suryavanshi Viral Video: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19व्या हंगामाला अद्याप बराच अवधी असला तरी, अनेक संघांनी आतापासूनच सरावाला सुरुवात केली आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्स संघ आघाडीवर असून त्यांच्या सराव शिबिरात सध्या एका 14 वर्षांच्या खेळाडूची जोरदार चर्चा रंगली आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून बिहारचा उगवता तारा वैभव सूर्यवंशी आहे. नुकताच सोशल मीडियावर राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये वैभवच्या एका खणखणीत फटक्याने चक्क सराव मैदानावरील पाण्याची पाईपलाईन फुटल्याचे पाहायला मिळत आहे.

सराव सत्रादरम्यान वैभवने इतका जोरदार 'पुल शॉट' लगावला की, चेंडू थेट पाण्याच्या पाईपवर जाऊन आदळला. चेंडूचा वेग आणि ताकद इतकी प्रचंड होती की पाईपला भगदाड पडून तिथून पाण्याचे कारंजे उडू लागले. वैभवच्या या फलंदाजीचे व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून, त्याच्या या ताकदीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मैदानातील या कामगिरीसोबतच वैभव सध्या त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेमुळेही चर्चेत आला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीला प्राधान्य देण्यासाठी वैभवने यंदाची सीबीएसई बोर्डाची परीक्षा न देण्याचा धाडसी निर्णय घेतला. वैभवच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या वैभवचे पूर्ण लक्ष आयपीएल 2026 च्या तयारीवर असून सरावातील व्यस्ततेमुळे तो यंदा परीक्षेला बसणार नाही.

वैभव सूर्यवंशीने अल्पावधीतच क्रिकेट विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला होता. विशेषतः अंतिम सामन्यात त्याने 175 धावांची विक्रमी खेळी साकारुन सर्वांना अवाक केले होते. संपूर्ण स्पर्धेत 7 सामन्यांत 439 धावा फटकावत तो भारताचा (India) 'मॅच विनर' ठरला. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी थक्क करणारी आहे. 2025 च्या हंगामात पदार्पण करताना त्याने केवळ 32 चेंडूत गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या 206.56 च्या तुफानी स्ट्राईक रेटमुळे राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा त्याच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT