Rishabh Pant Brand Ambassador Dainik Gomantak
क्रीडा

ऋषभ पंत बनला उत्तराखंडचा Brand Ambassador, 'तरुणांना प्रोत्साहन मिळेल'

Uttarakhand Government: उत्तराखंड सरकारने क्रिकेटपटू ऋषभ पंतची राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

दैनिक गोमन्तक

Rishabh Pant Brand Ambassador: उत्तराखंड सरकारने क्रिकेटपटू ऋषभ पंतची राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. ज्यामुळे राज्यातील तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहन मिळेल. सीएम पुष्कर सिंह धामी यांनीही यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

दरम्यान, आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी लिहिले की, 'ऋषभ पंतला (Rishabh Pant) राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवून राज्यातील तरुणांनाही प्रेरणा मिळेल.' राज्यातील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

दुसरीकडे, रिषभ पंतने इंग्लंड (England) सोबत सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना, 77 चेंडूंचा सामना करत 58 धावा केलेल्या आहेत. यावेळी रिषभ पंतने तीन उत्तुंग षटकार आणि सात चौकार खेचले. रिषभ पंतने ही कामगिरी करताना लगावलेल्या षटकारांमुळे त्याच्या नावावर आता अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. रिषभ पंत हा 23 वर्षांचा आहे. आणि या वयात क्रिकेटच्या कसोटी प्रकारात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रिषभ पंतच्या नावावर झाला आहे. यापूर्वी टिम साऊथीने कसोटीत सर्वात अधिक षटकार मारले होते. मात्र इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतने तीन षटकार खेचताच हा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT