Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

US Open: जोकोविच विक्रमी ग्रँडस्लॅम विजयापासून दोन पाऊले दूर! तब्बल 47 व्यांदा सेमी-फायनलमध्ये धडक

Novak Djokovic: नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

Pranali Kodre

US Open 2023 Novak Djokovic enter into the 47th Grand Slam semi-final:

अमेरिकन ओपन 2023 स्पर्धा सध्या सुरू असून या स्पर्धेत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. पण असे असले तरी 36 वर्षीय नोव्हाक जोकोविचने मात्र, आपले सातत्य आणि दबदबा कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे जोकोविचने तब्बल 47 व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने याबाबतीत रॉजर फेडररला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. फेडररने 46 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचे उपांत्य सामने खेळले आहेत. तसेच राफेल नदालने 38 वेळा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी खेळली आहे.

अमेरिकन ओपन 2023 स्पर्धेत जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला पराभूत केले. जोकोविचने फ्रिट्झला 6-1, 6-4, 6-4 अशा सरळ तीन सेटमध्ये सहज पराभूत केले.

जोकोविच इतिहास रचण्यापासून दोन पाऊले दूर

जोकोविचने आत्तापर्यंत 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे आता विक्रमी 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यापासून जोकोविच दोन पाऊले दूर आहे. आत्तापर्यंत एकेरीत केवळ मार्गारेट कोर्टला 24 वेळा ग्रँडस्लॅम जिंकता आले आहे. त्यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची जोकोविचला संधी असणार आहे.

दरम्यान, जोकोविचने आत्तापर्यंत 23 ग्रँडस्लॅम विजयांपैकी तीनवेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याने 2011, 2015 आणि 2018 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. दरम्यान, 2018 नंतर त्याला अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे तो आता चौथ्यांदा अमेरिकन ओपन जिंकण्यासाठी उत्सुक असेल.

उपांत्य सामना

जोकोविच उपांत्य फेरीत बिगर मानंकित बेन शेल्टनविरुद्ध सामना खेळणार आहे. अमेरिकेच्या बेन शेल्टनने यंदा सर्वांनाच चकीत करत उपांत्य सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

शेल्टनने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्याच 10 व्या मानांकित फ्रान्सेस टायफोएला 6-2,3-6,7-6 (9-7),6-2 आशा चार सेटमध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे आता जोकोविच आणि शेल्टन यांच्यात शुक्रवारी उपांत्य सामना रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

Love Horoscope: जोडीदाराला थोडा वेळ द्या! अनुभवा 'मोठे' बदल; वाचा प्रेम राशीफळ

Michael Clarke Cancer: विश्वचषक जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटपटूला कर्करोग, पोस्ट करत दिली माहिती

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

SCROLL FOR NEXT