FIFA World Cup 2026 Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup: मेस्सी एकदा जिंकला...आता रोनाल्डोही जिंकावा

FIFA World Cup 2026: मी ज्यांच्या घरी राहिलो होतो ते रोटरीचे माजी प्रांतपाल अल्फ्रेदो देल्गादो आणि त्यांचे कुटुंबीय, सारेच क्रीडाप्रेमी आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

प्रसाद सोवनी

मी ज्यांच्या घरी राहिलो होतो ते रोटरीचे माजी प्रांतपाल अल्फ्रेदो देल्गादो आणि त्यांचे कुटुंबीय, सारेच क्रीडाप्रेमी आहेत. टीव्हीवर दिवसभर जगात कुठेही चालू असलेले लीग फुटबॉल आणि फुटबॉल नसल्यास बास्केटबॉल, फॉर्म्युला वन कार रेसिंग, गोल्फ, सायकलिंग असे विविध खेळ चालू असतात. त्यांच्या मते उरुग्वेला संधी कमी आहे, कारण यंदाचा त्यांचा संघ तितकासा तगडा नाहीये. २०१० मधील संघ खूप चांगला असूनदेखील जिंकला नव्हता, याचं दुःख अजूनही होते.

दुसरा एक माजी प्रांतपाल गोंझालो बरांदा हा आर्किटेक्ट म्हणतो, जे संघ आपल्या खेळाडूंना रोटेशन करून पुरवून पुरवून वापरतील ते जिंकतील. तीन साखळी सामने झाल्यावर बाद फेरीचे पाच सामने असल्यामुळे एक दिवस वाईट गेला तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर असाल. अशा स्थितीत रोटेशनदेखील काळजीपूर्वक करावे लागेल. त्याच्या मते पोर्तुगाल संघ जास्त समतोल आहे आणि जिंकू शकेल.

राजकारण्यांचे कार्य

फुटबॉल हे लोकांचे लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांवरून हटवण्यासाठी राजकारण्यांनी चालवलेले कार्य आहे. आता महिनाभर कोणीही काम करणार नाही इकडे; पण आपला आजचा समाज असाच आहे, असे काहींचे मत आहे. यंदा पोर्तुगाल जिंकावा, असे काहींना वाटते. मेस्सी जितका श्रेष्ठ आहे तितकाच श्रेष्ठ ख्रिस्तियानो रोनाल्डोसुद्धा आहे. मेस्सीला एक विजेतेपद मिळाले आता रोनाल्डोला का नको, असे म्हटले जात आहे.

युरोपियन संघाला विजेतेपद नको!

चार्टर्ड अकाउंटंट अंतोनिओ कास्त्रो याच्या मते उरुग्वे संघ जिंकत नसेल, तर दक्षिण अमेरिकेतील कुठलाही संघ जिंकू दे. युरोपियन नको. विकतोरीया ही संगणकतज्ज्ञ म्हणते, ४८ संघ मात्र खूप होतात. पूर्वी ३२ होते ते पण जास्तच होते. २४ वगैरे ठीक आहे, ४८ संघ आणि १०४ सामने हे फारच होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT