Union Budget 2023-24 | Sports Budget  Dainik Gomantak
क्रीडा

Sports Budget 2023: एशियन गेम्सपूर्वी खेळाडूंसाठी गुड न्यूज! क्रीडा निधीमध्ये केली बंपर वाढ

बुधवारी सादर 2023-24च्या अर्थसंकल्पात क्रीडा निधीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Sports Budget 2023: बुधवारी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 वर्षासाठी अर्थसंकल्पाची घोषणा केली आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी इतिहासातील सर्वात मोठा निधी जाहीर झाला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या निधीमध्ये 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

निर्मला सीतारामन यांनी 2023-24 साठी क्रीडा क्षेत्रासाठी 3397.32 कोटींचा निधी जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी एशियन गेम्स खेळवण्यात येणार आहेत. तसेच खेळाडू 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकची तयारीही करत आहेत. या गोष्टींचा विचार करता क्रीडा क्षेत्रासाठीच्या निधीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा वाढ करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी म्हणजे 2022-23 साठी क्रीडा क्षेत्रासाठी 3062 कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला होता. त्यातुलनेत यावर्षी 334.72 कोटी रुपयांचा अधिक निधी जाहीर झाला आहे.

गेल्या काही वर्षात भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती दिसून आली आहे. अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी करत जगभरात डंका वाजवला आहे. त्याचा विचार करून गेल्यावर्षी देखील 300 कोटीची निधीमध्ये वाढ केली होती. तशीच वाढ यावर्षीच्या अर्थसंकल्पातही जाहीर झाली.

गेल्या तीन वर्षातील क्रीडा निधीबद्दल सांगायचे झाल्यास 2020-21 मध्ये 2826 कोटी रुपये जाहीर झाला होता. पण त्यानंतर कोरोनाच्या कारणाने क्रीडा निधीमध्ये 2021-22 साठी कपात करण्यात आली होती. त्यावर्षी सुरुवातीला 2596 कोटी निधी जाहीर झालेला, नंतर त्यात वाढ करून एकूण 2757 कोटी रुपये करण्यात आला होता.

पण, त्यानंतर 2021 मध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीचा विचार करता 2022-23 साठी क्रीडा निधीमध्ये तब्बल 305 कोटींची वाढ करण्यात आली होती.

दरम्यान, यावर्षीही एशियन गेम्स, खेलो इंडिया यांसारख्या महत्त्वाचे स्पर्धा आहेत. तसेच पुढीलवर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या सर्व गोष्टींची लक्षात घेऊन क्रीडा निधीमध्ये वाढ करण्यात आली.

खेलो इंडियाच्या निधीमध्येही वाढ

साल 2023-24 साठी खेलो इंडियासाठी 1000 कोटींचा निधी मिळाला आहे. 2022-23 मध्ये खेलो इंडियासाठी 974 कोटी रुपयांचा निधी होता.

गेल्या पाच वर्षातील क्रीडा निधी -

2018-19 - 2197 कोटी

2019-20 - 2776 कोटी

2020-21 - 2826 कोटी

2021-22 - 2596 कोटी (2757 कोटी)

2022-23 - 3062 कोटी

2023-24 - 3397 कोटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजपचा पराभव करण्यासाठीच गोवा फर्स्ट'; विजय सरदेसाईंचा काँग्रेसलाही टोला, 'आमचे लक्ष्य फातोर्डा नव्हे, गोवा'

Goa Politics: ओवैसींच्या गोवा नागरी कायद्यावरील दाव्यांना भाजपचा आक्षेप; यतीश नाईक म्हणाले, 'कायदा धर्म-जात न पाहता सर्वांसाठी समान'

Dog Attack Viral Video: 6 महिन्यांच्या बाळावर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, आत्यानं वाचवला चिमुरडीचा जीव; अंगावर काटा आणणारा थरार व्हायरल!

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ भक्कम स्थितीत! दररोज 84 विमानांची ये-जा, 13 हजार प्रवाशांची हाताळणी; विमानतळाला 137 कोटींचा नफा

Tarun Tejpal: कधी सत्ताकेंद्रांना प्रश्न, आता कारागृहाचे नियम! कोलवाळमध्ये तेजपालचा दिवस कसा जातो? शेजारी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता

SCROLL FOR NEXT