Goa Team player Dainik Gomantak
क्रीडा

Vinoo Mankad Trophy: गोव्याच्या मुलांची विजयी सलामी; अरुणाचल प्रदेशला सहजपणे नमविले

शंतनू, मल्हारची अर्धशतके

किशोर पेटकर

Vinoo Mankad Trophy: गोव्याच्या 19 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने गुरुवारी विनू मांकड करंडक एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी देताना कमजोर अरुणाचल प्रदेशवर 124 धावांनी दणदणीत विजय नोंदविला. ‘ड’ गटातील सामना पुदुचेरी येथे झाला.

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निर्धारित ५० षटकांत ५ बाद २५८ धावा केल्या. शानदार अर्धशतके नोंदवलेल्या शंतनू नेवगी व मल्हार नाईक यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली.

त्यामुळे वीर यादव याला लवकर गमावल्यानंतर गोव्याला सावरता आले. शंतनू याने ६९ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ६१, तर मल्हारने ७४ चेंडूंत सात चौकारांसह ५२ धावा नोंदविल्या.

नंतर यश कसवणकर (३८), दिशांक मिस्कीन (४५ चेंडूंत नाबाद ३२), जीवनकुमार चित्तेम (२४) यांचे योगदानही डावात महत्त्वपूर्ण ठरले. दिशांक व जीवनकुमार यांनी पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याने अडीचशे धावांचा टप्पा ओलांडला.

उत्तरादाखल अरुणाचल प्रदेशचा डाव ४४.१ षटकांत १३४ धावांत आटोपला. मध्यमगती युवराज सिंग याने शानदार मारा करताना ३२ धावांत ४ गडी टिपले.

त्याला चांगली साथ देताना स्वप्नील गावकर व शिवांक देसाई यांनी प्रत्येकी २ विकेट मिळविल्या. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना शनिवारी (ता. १४) सौराष्ट्रविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा : ५० षटकांत ५ बाद २५८ (वीर यादव १५, शंतनू नेवगी ६१, मल्हार नाईक ५२, यश कसवणकर ३८, दिशांक मिस्कीन नाबाद ४२, जीवनकुमार चित्तेम २४, हर्ष २-३९, भार्गव २-२७) वि.

वि. अरुणाचल प्रदेश : ४४.१ षटकांत सर्वबाद १३४ (आकाश १७, रेबी २४, दुष्यंत ४७, पुंडलिक नाईक ७.१-०-१९-१, युवराज सिंग १०-१-३२-४, स्वप्नील गावकर ९-४-२१-२, शिवांक देसाई ६-२-२०-२, मल्हार नाईक ६-०-२५-०, यश कसवणकर ६-१-१५-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT