Anil Chaudhary Acting Dainik Gomantak
क्रीडा

Anil Chaudhry Dance: "गोली तो चलेगी!" अंपायर अनिल चौधरींचा कडक स्वॅग; 'या' व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली आग Watch Video

Anil Chaudhary Acting: क्रिकेटच्या मैदानातील कडक शिस्तीचे आंतरराष्ट्रीय अंपायर अनिल चौधरी आता एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

Manish Jadhav

Umpire Anil Chaudhary Video: क्रिकेटच्या मैदानातील कडक शिस्तीचे आंतरराष्ट्रीय अंपायर अनिल चौधरी आता एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मैदानातील शिस्तबद्ध अंपायरिंग सोडून आता त्यांनी चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले असून त्यांचा एक म्युझिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'गोली तो चलेगी' (Goli To Chalaigi) असे या गाण्याचे नाव असून यात अनिल चौधरी यांचा रांगडा आणि 'डॉन' सारखा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.

अनिल चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या अंपायरिंगने एक वेगळी छाप पाडली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून ते आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दिसत नव्हते. अंपायरिंगपासून दूर गेल्यावर त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) आपला वावर वाढवला आणि त्यांच्या हटके हरियाणवी भाषेतील कमेंट्रीने चाहत्यांना भुरळ घातली. आता हीच हरियाणवी ढब त्यांनी अभिनयात उतरवली आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि आता चित्रपट निर्माते बनलेले सुमन गुहा यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले, तर नरेश झा यांनी 'एपिक फिल्म्स'च्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. या गाण्यात चौधरींसोबत रोहित खरब, चांदनी राऊत आणि हेमेश दीक्षित यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आपल्या या नवीन प्रवासाविषयी बोलताना अनिल चौधरी कमालीचे उत्साही दिसले. ते म्हणाले की, "मला कॅमेऱ्यासमोर कधीच भीती वाटली नाही, कारण मी सातत्याने हरियाणवीमध्ये कमेंट्री करत असतो. दिग्दर्शक सुमन गुहा यांनी माझ्याकडून उत्तम काम करुन घेतले आणि निर्माते नरेश झा यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. शूटिंग करताना खूप मजा आली. अंपायरिंग आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांची स्वतःची एक वेगळी मजा आहे." त्यांच्या या विधानावरुन त्यांना अभिनयाची ही नवी इनिंग प्रचंड आवडल्याचे दिसून येते.

अनिल चौधरी यांची अंपायर म्हणून कारकीर्द अत्यंत यशस्वी राहिली आहे. स्थानिक क्रिकेटपासून सुरुवात करुन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 कसोटी सामने, 49 एकदिवसीय आणि 64 टी-20 सामन्यांमध्ये पंच म्हणून भूमिका बजावली आहे. इतकेच नाही तर महिला क्रिकेटमध्येही 1 कसोटी आणि 11 एकदिवसीय सामन्यांत त्यांनी अंपायरिंग केले आहे. सध्या ते स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवत असून क्रिकेट विश्लेषणात व्यग्र आहेत. विशेष म्हणजे, आगामी आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये ते पुन्हा एकदा आपल्या लाडक्या हरियाणवी भाषेत कमेंट्री करताना दिसू शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मैदानावर शांत राहणारे चौधरी आता पडद्यावर 'गोळ्या' झाडताना पाहून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''लादेन कुठं लपला होता माहितचं असेल...'', भारतानं पुन्हा फाडला पाकड्यांचा बुरखा; दहशतवाद्यांच्या आश्रयदात्याचा पर्दाफाश

Goa Beach Shacks: गोव्याच्या 'शॅक कायद्या'च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान; पर्यावरणाला धोका असल्याचा दावा, हायकोर्टाची सरकारला नोटीस

Goa Dairy: गोवा डेअरीचे व्यवस्थापन 'NDDB'कडेच राहणार? हायकोर्टाचे निर्देश; सर्व निर्णय आणि सामंजस्य कराराचे प्रतिज्ञापत्र सादर करा

Varca Panchayat Construction Permit: हायकोर्टाच्या निर्देशांनाच हरताळ; बांधकाम परवान्यात स्वतःच्या अटी लादल्याने वार्का पंचायत सचिवाला कडक ताकीद

Online Payment: ऐन गणेश चतुर्थीत गॅससाठी 'रोखी'ची सक्ती; Google Pay बंद, ऑनलाइन पेमेंट करता न आल्याने ग्राहकांची मोठी परवड

SCROLL FOR NEXT