Umesh Yadav Leaves Vidarbha Dainik Gomantak
क्रीडा

Umesh Yadav: 2023 पासून टीम इंडियाबाहेर, उमेश यादवचा अचानक मोठा निर्णय! संघ बदलला; नव्या टीमकडून खेळणार

Umesh Yadav Leaves Vidarbha: भारतीय क्रिकेट संघापासून बऱ्याच काळापासून दूर असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याने आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामापूर्वी मोठा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघापासून बऱ्याच काळापासून दूर असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याने आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामापूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. उमेशने आपल्या घरच्या विदर्भ क्रिकेट संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून आता तो दुसऱ्या राज्याच्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. या बदलासाठी त्याला विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून (VCA) नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच NOC मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या संघाकडून खेळण्याची उमेशची तयारी

उमेश यादवने स्वतः या निर्णयाला दुजोरा दिला आहे. आगामी हंगामात अधिक क्रिकेट खेळण्याच्या उद्देशाने त्याने हा निर्णय घेतल्याचे समजते. काही राज्य क्रिकेट संघटनांशी त्याची चर्चा सुरू असून लवकरच त्याच्या पुढील संघाबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्या संघाकडून तो खेळणार, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

विदर्भ सोडण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही

उमेशच्या निर्णयामागे त्याच्या भविष्यातील भूमिकेबाबत निर्माण झालेली अनिश्चितता हे एक कारण असल्याचे वृत्त आहे. विदर्भ संघात आपली भूमिका आणि आगामी योजनांबाबत त्याला पुरेशी स्पष्टता मिळत नसल्याची चर्चा होती. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमितपणे खेळण्याची संधी मिळावी आणि आपल्या अनुभवाचा उपयोग करता यावा, या उद्देशाने त्याने नव्या संघाचा पर्याय निवडल्याचे मानले जात आहे.

भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू

38 वर्षीय उमेश यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असूनही क्रिकेटमधील आपले योगदान संपलेले नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी करून पुन्हा चर्चेत येण्याचा त्याचा प्रयत्न असू शकतो. भारतीय संघाच्या निवड समितीकडून मागील काही काळात त्याचा विचार झालेला नाही. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणे त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.

2023 मध्ये खेळला होता अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना

उमेश यादवने 2010 मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही. आपल्या कारकिर्दीत त्याने भारताचे प्रतिनिधित्व तिन्ही फॉरमॅटमध्ये केले आहे.

तिन्ही फॉरमॅटमध्ये 288 विकेट्स

उमेश यादवने भारतासाठी आतापर्यंत एकूण 141 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याच्या नावावर 288 विकेट्स आहेत. विशेषतः भारतीय खेळपट्ट्यांवर कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे. मायदेशात खेळलेल्या 32 कसोटी सामन्यांत त्याने 101 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी 25.88 इतकी राहिली आहे.

भारतीय परिस्थितीत वेगवान गोलंदाज म्हणून प्रभाव

2018 नंतर भारतीय परिस्थितीत कसोटी क्रिकेटमध्ये उमेशची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. या कालावधीत त्याने 11 सामन्यांत 43 विकेट्स घेतल्या असून त्याची गोलंदाजीची सरासरी 18.25 इतकी आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये दोन वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी आहे. तसेच एका सामन्यात दहा विकेट्स घेण्याचाही पराक्रम त्याने केला आहे.

नव्या संघातून उमेशचा अनुभव उपयोगी ठरणार?

विदर्भपासून वेगळे झाल्यानंतर उमेश यादव आता कोणत्या राज्य संघाची निवड करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून त्याचा अनुभव नव्या संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आगामी देशांतर्गत हंगामात उमेशची कामगिरी कशी राहते आणि त्यातून त्याला पुन्हा भारतीय संघाच्या निवडीच्या चर्चेत स्थान मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

SCROLL FOR NEXT