UAE Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

UAE vs New Zealand: युएईचा मोठा उलटफेर! न्यूझीलंडला T-20 सामन्यात पराभूत करत रचला इतिहास

Pranali Kodre

UAE scripted history as they won 2nd T20I against New Zealand:

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यावर असून तीन सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात युएईने न्यूझीलंडला जबरदस्त पराभवाचा धक्का दिला आहे.

शनिवारी युएईने दुसरा टी20 सामना 7 विकेट्सने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता रविवारी होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. युएईच्या विजयात आयान खान आणि कर्णधार मोहम्मद वासिम यांनी महत्त्वाचा वाटा उचलला.

दरम्यान, युएईचा हा न्यूझीलंडविरुद्धचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच विजय देखील ठरला आहे.

दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने युएईसमोर विजयासाठी 143 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग युएईने 15.4 षटकात 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

खरंतर न्यूझीलंडने सुरुवात चांगली केली होती. पहिल्याच षटकात कर्णधार टीम साऊथीने आर्यांश शर्माला शुन्यावर बाद केले होते. मात्र त्यानंतर कर्णधार वासिमला वृत्य अरविंदने साथ दिली आणि त्यांनी डाव पुढे नेला. पण अरविंद 25 धावांवर काईल जेमिसनकडून त्रिफळाचीत झाला.

मात्र, त्यानंतरही वासिमने आक्रमक फटकेबाजी सुरू ठेवली होती. त्याला असिफ खानची दमदार साथ मिळाली. या दोघांनी जोडी खेळपट्टीवर चांगली जमली होती. वासिमने अर्धशतकही केले.

मात्र, त्यानंतर तो 11 व्या षटकात मिचेल सँटेनरविरुद्ध खेळताना बाद झाला. पण तोपर्यंत युएईसाठी विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्याने 29 चेंडून 55 धावांची खेळी केली. यानंतर असिफ खान आणि बसिल हमीद यांनी युएईला विजयापर्यंत पोहचवले. असिफ 29 चेंडूत 48 धावा करून नाबाद राहिला, तर हमीद 12 धावांवर नाबाद राहिला.

तत्पुर्वी, युएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मात्र न्यूझीलंडची फलंदाजी चांगलीच गडगडली. त्यांनी 65 धावांतच 5 विकेट्स गमावल्या होत्या. यातील 3 विकेट्स आयन खाननेच घेतल्या होत्या.

पण त्यानंतर मार्क चॅपमन आणि जिमी निशम यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी 53 धावांची भागीदारी केली. मात्र त्यांची भागीदारी अली नासिरने तोडली. त्याने निशमला 21 धावांवर बाद केले.

त्यानंतरही चॅपमनने आपली लय कायम ठेवली होती. पण तोही अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने अर्धशतक करताना 46 चेंडूत 63 धावांची खेळी केली.

न्यूझीलंडकडून निशम आणि चॅपमन यांच्याव्यतिरिक्त केवळ चड बोवेस यालाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्याने सलामीला खेळताना 21 धावा केल्या. न्यूझीलंडला 20 षटकात 9 बाद 142 धावाच करता आल्या.

युएईकडून आयन खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद जवादुल्लाहने 2 विकेट्स घेतल्या. अली नासिर, जहुर खान आणि मोहम्मद फराझुद्दीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT