Shweta Sehrawat and Shafali Verma in U19 Women's T20 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

U19 Women's T20 World Cup: शफाली-श्वेताची पुन्हा तुफानी फलंदाजी! भारतीय महिलांचा युएईवर दणदणीत विजय

19 वर्षांखालील महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे.

Pranali Kodre

U19 India Women vs U19 South Africa Women: दक्षिण आफ्रिकेत सध्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप खेळवला जात आहे. या स्पर्धेत सोमवारी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाचा सामना विलमुरे पार्क, बेनोनी येथे 19 वर्षांखालील संयुक्त अरब अमिराती (युएई) महिला संघाविरुद्ध झाला. या सामन्यात भारतीय संघाने 122 धावांनी विजय मिळवला आहे.

भारतीय संघाने युएईला 220 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना युएईच्या संघाला 20 षटकात 5 बाद 97 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना सहज जिंकला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय असून डी ग्रुपमध्ये भारत आता अव्वल क्रमांकावर आहे.

युएईकडून माहिका गौरने सर्वाधिक 26 धावा केल्या. तसेच लावण्या केनीने 24 धावा केल्या, पण तिने यासाठी तब्बल 54 चेंडू खेळले. या दोघींव्यतिरिक्त युएईच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

भारताकडून शबनम, तितास साधू, मन्नत कश्यप आणि पार्श्ववी चावला यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, युएईने नाणेफेक जिंकली असून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय संघानेही याचा फायदा घेत आक्रमक फलंदाजी केली. भारताकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरलेल्या श्वेता सेहरावत आणि शफाली वर्मा यांनी 111 धावांची शतकी भागीदारी केली. या दोघींनीही तुफानी फलंदाजी केली.

श्वेताने 49 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी करताना 10 चौकार मारले. तसेच शफालीने 34 चेंडूत 78 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 12 चौकार आणि 4 षटकार मारले.

या दोघींव्यतिरिक्त रिचा घोषणेही आक्रमक फलंदाजी करताना 5 चौकार आणि 2 षटकारांसह 49 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 20 षटकात 3 बाद 219 धावा केल्या. युएईकडून इंधुजा नंदकुमार, माहिका गौर आणि समायरा धारक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पहिल्या सामन्यातही श्वेता-शफालीची फटकेबाजी

या स्पर्धेत भारताचा पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील महिला संघाशी झाला होता. या सामन्यात देखील शफाली आणि श्वेता यांनी फटकेबाजी केली होती. शफालीने 16 चेंडूत 45 धावांची आणि श्वेनाने 57 चेंडूत नाबाद 92 धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

घटस्थापनेला नवनिर्वाचित समितीकडे पदभार, 'GCA'च्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा

ट्रेन रुळावरुन घसरली तर पुन्हा रुळांवर कशी आणली जाते? प्रत्यक्ष व्हिडिओ पाहा Watch

Goa Drug Case: मांडवी एक्स्प्रेसमधून उतरला अन् पोलिसांच्या हाती लागला, 3.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नेपाळच्या नागरिकाला अटक

Artificial Intelligence: 'एआय'चा प्रभाव, वकील नामशेष होणार की आणखी सक्षम?

SCROLL FOR NEXT