Adarsh Singh and Captain Uday Saharan X/BCCI
क्रीडा

U19 World Cup: आदर्शला कर्णधार उदयची साथ, पण मारुफ भारताचे बांगलादशसमोर विजयासाठी 252 धावांचे लक्ष्य

India U19 vs Bangladesh U19: 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशसमोर 252 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

ICC U19 Cricket World Cup 2024, U19 India vs U19 Bangladesh:

शनिवारी (20 जानेवारी) 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश संघात ब्लोएमफाँटेनला सामना होत आहे. हा या स्पर्धेतील दोन्ही संघांचा पहिलाच सामना आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशसमोर 252 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 251 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर आदर्श सिंगने आणि कर्णधार उदय सहारन यांनी अर्धशतके केली. तसेच बांगलादेशकडून मारुफ मृधाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे भारताकडून आदर्श सिंग आणि अर्शिन कुलकर्णी हे सलामीला फलंदाजीला उतरले. मात्र अर्शिन चौथ्या षटकात, तर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेला मुशीर खान 8 व्या षटकात स्वस्तात बादल झाले.

मात्र त्यानंतर आदर्शला उदयने चांगली साथ दिली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. त्यांनी 116 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान आदर्शने अर्धशतकही पूर्ण केले. दरम्यान त्यांची भागीदारी ३२ व्या षटकात चौधरी मोहम्मद रिझवानने तोडली. त्याने आदर्शला बाद केले. आदर्शने 96 चेंडूत 6 चौकारांसह 76 धावा केल्या.

त्यानंतर काहीवेळात उदयरला बांगलादेशचा कर्णधार महफुझर रेहमान रब्बीने बाद केले. उदयनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने 94 चेंडूत 4 चौकारांसह 64 धावा केल्या.

हे दोघे बाद झाल्यानंतर प्रियांशू मोलिया (23), अरावेल्ली अविनाश (23), सचिन धस (26) यांनी छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे भारताला अडीचशे धावांचा टप्पा पार करता आला.

बांगलादेशकडून मारुफ व्यतिरिक्त चौधरी मोहम्मद रिझवान आणि कर्णधार महफुझर रेहमान रब्बी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya: जय हो! चांगली बातमी कानावर पडणार; या राशींसाठी महत्वाचा काळ सुरु

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT