U19 Team India
U19 Team India X/BCCI
क्रीडा

U19 World Cup: भारतीय युवा संघ सुपर-सिक्समध्ये! 'या' टीमविरुद्ध करणार दोन हात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Pranali Kodre

U19 Cricket World Cup 2024, Super Six Schedule, Team India Matches:

दक्षिण आफ्रिकेत सध्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिली फेरी संपली असून आता 30 जानेवारीपासून सुपर सिक्स फेरी सुरू होणार आहे. याचे वेळापत्रक समोर आले आहे.

सुपर सिक्सची फेरी 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार असून यात 12 सामने होणार आहेत. दरम्यान, सुपर सिक्समध्ये उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानेही प्रवेश केला आहे. भारताचे सामने न्यूझीलंड आणि नेपाळविरुद्ध होणार आहेत.

असे आहे स्पर्धेचे स्वरुप

या स्पर्धेत पहिली फेरी 16 संघांमध्ये पार पडली होती. या 16 संघांचे चार गटात विभाजन करण्यात आले होते. या चार गटातून प्रत्येकी ३ संघांना सुपर सिक्स फेरीत प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे आता 12 संघांचे सुपर सिक्ससाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

सुपर सिक्समध्ये ए आणि डी गटातील तीन-तीन संघांचा एकत्र एक गट आणि बी आणि सी गटातील तीन-तीन संघांचा एकत्र दुसरा गट केला गेला आहे.

दरम्यान, आयसीसीच्या नियमांनुसार सुपर सिक्समध्ये पोहचलेले संघ आपल्या पहिल्या फेरीच्या गटातील संघाशी सामना खेळणार नाही. त्यांच्यात पहिल्या फेरीत झालेल्या सामन्यातील निकालच सुपर सिक्ससाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच दुसऱ्या गटातील त्याच क्रमांकाच्या संघाशीही सामना खेळणार नाही.

म्हणजेच भारतीय संघ पहिल्या फेरीक ए गटात होता. भारताने ए गटात अव्वल क्रमांक पटकावला होता. दरम्यान ए गटातून भारत, बांगलादेश आणि आयर्लंड हे तीन संघ अनुक्रमे एक, दोन आणि तीन क्रमांकावर राहात सुपर सिक्समध्ये पोहचले आहेत.

तसेच डी गटातून पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ या तीन संघांनी अनुक्रमे एक, दोन आणि तीन क्रमांक मिळवत सुपर सिक्समध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या सहा संघांचा एक गट सुपर सिक्ससाठी तयार करण्यात आला आहे.

परंतु, भारतीय संघाने पहिल्या फेरीत बांगलादेश आणि आयर्लंडविरुद्ध आधीच सामना खेळलेला असल्याने त्यांच्यात लागलेला निकालच सुपर फेरीसाठी कायम केला जाणार आहे.

म्हणजेच पहिल्या फेरीत भारताने बांगलादेश आणि आयर्लंड विरुद्ध मिळवलेले विजयच सुपर सिक्ससाठीही ग्राह्य धरले जातील. त्यामुळे सुपर सिक्समध्ये भारतीय संघ या दोन संघाविरुद्ध सामना खेळणार नाही.

तसेच भारताचा सामना पाकिस्तानविरुद्धही होणार नाही. कारण पाकिस्तानने पहिल्या फेरीत डी गटात अव्वल क्रमांक मिळवला होता आणि नियमानुसार दुसऱ्या गटातील त्याच क्रमांकाच्या संघाशी सामना होणार नाही.

त्यामुळे भारताचा सुपर सिक्समधील सामना केवळ न्यूझीलंड (डी गटातील दुसरा संघ) आणि नेपाळविरुद्ध (डी गटातील तिसरा संघ) होणार आहेत. तसेच पाकिस्तानचा सामना केवळ बांगलादेश (ए गटातील दुसरा संघ) आणि आयर्लंडशी (ए गटातील तिसरा संघ) होणार आहे.

हेच नियम पहिल्या फेरीतून बी आणि सी गटातून सुपर सिक्ससाठी पात्र ठरलेल्या संघांनाही लागू आहे.

दरम्यान, सुपर सिक्स फेरीनंतर दोन्ही गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. उपांत्य फेरीतील सामने 6 आणि 8 फेब्रुवारीला होईल. तसेच अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने बेनोनीला होणार आहेत.

सुपर सिक्ससाठी गटवारी

  • पहिला गट - भारत, बांगलादेश, आयर्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ

  • दुसरा गट - दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे.

भारताचे सामने

भारतीय संघ सुपर सिक्स फेरीत पहिला सामना 30 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. तसेच दुसरा सामना 2 फेब्रुवारी रोजी नेपाळविरुद्ध खेळणार आहे. हे दोन्ही सामने ब्लोएमफाँटेनला होणार आहेत. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहेत.

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीचे वेळापत्रक

  • 30 जानेवारी 2024

    • भारत विरुद्ध न्यूझीलंड, ब्लोएमफाँटेन

    • श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज, किम्बर्ली

    • पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, पॉचेफस्ट्रूम

  • 31 जानेवारी 2024

    • नेपाळ विरुद्ध बांगलादेश, ब्लोएमफाँटेन

    • ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, किम्बर्ली

    • झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पॉचेफस्ट्रूम

  • 2 फेब्रुवारी 2024

    • भारत विरुद्ध नेपाळ, ब्लोएमफाँटेन

    • वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, किम्बर्ली

    • दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, पॉचेफस्ट्रूम

  • 3 फेब्रुवारी 2024

    • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, बेनोनी

    • न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड, ब्लोएमफाँटेन

    • इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे, पॉचेफस्ट्रूम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid At Mapusa: म्हापसामध्ये अन्न आणि औषध प्रशानसनाची मोठी कारवाई; 500 किलो पनीर जप्त

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

Panjim: आश्‍‍चर्य! पणजीत एकही नाही धोकादायक इमारत, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचा दावा

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: म्हापसामध्ये FDA ची मोठी कारवाई; 500 किलो पनीर जप्त

SCROLL FOR NEXT