Wrestlers Protest | FIR against Brij Bhushan Sharan Singh Dainik Gomantak
क्रीडा

Wrestlers Protest: ब्रीजभूषण विरुद्ध दोन FIR दाखल! विनयभंग, लैंगिक अत्याचारासह कुस्तीपटूंनी लावले 'हे' आरोप

Pranali Kodre

FIR against Wrestling Federation of India chief and BJP MP Brij Bhushan Sharan Singh: गेल्या अनेक महिन्यांपासून भारताच्या पदक विजेते कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रीजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप ब्रीजभूषण यांच्यावर केला आहे.

आता या प्रकरणातील नवीन माहिती समोर आली असून दिल्ली पोलिसांनी ब्रीजभूषण विरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत. एफआयआरमध्ये कुस्तीपटूंनी ब्रीजभूषण विरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आरोप केला आहे. यामध्ये लैंगिक अत्याचाराचे जवळपास 15 आणि अयोग्य स्पर्श करणे, छाती आणि नाभीला स्पर्श करणे, स्टॉक करणे अशा 10 गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी ब्रीजभूषण यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर कुस्तीपटू सुप्रीम कोर्टातही गेले होते. त्यानंतर २८ एप्रिल रोजी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

ब्रीजभूषण सिंग यांच्याविरुद्ध आरोप

या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354 (महिलेचा विनयभंग), ३५४ए (लैंगिक छळ), ३५४डी (स्टॉकिंग) आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपीला ३ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तसेच POCSO कायद्यानुसार पाच ते सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

पहिल्या एफआयआरमध्ये सहा ऑलिम्पियन्स खेळाडूंच्या आरोपांचा उल्लेख आहे, तर दुसऱ्या एफआयआरमध्ये अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लावलेल्या आरोपांचा उल्लेख आहे.

अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपानुसार ब्रीजभूषण यांनी फोटो काढण्याच्या बहाण्याने तिला घट्ट पकडले होते. तसेच तिच्या खांद्याला आणि तिला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तसेच तिने तिच्या तक्रारीत हे देखील स्पष्ट केले आहे की तिने ब्रीजभूषण यांना सांगितले होते की तिला फॉलो करू नका.

याशिवाय एफआयआरमध्ये ब्रीजभूषण यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून, प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत, श्वास तपासण्याच्या बहाण्याने, सप्लिमेंट पुरवण्याचा लोभ दाखवत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.

कुस्तीपटूंना देशभरातून पाठिंबा

दरम्यान, कुस्तीपटूंचे अद्यापही अंदोलन सुरू असून त्यांना देशभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यांनी ब्रीजभूषण यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी हे अंदोलन सुरू केले आहे. अनेक क्रीडापटूंनीही त्यांना या अंदोलनात पाठिंबा दिला आहे.

या अंदोलनात भारताचे स्टार कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया, संगिता फोगट हे देखील सामील आहेत.

जागतिक कुस्ती महासंघानेही घेतली दखल

भारतीय कुस्तीपटूंनी केलेल्या अंदोलनाची दखल आता जागतिक कुस्ती महासंघानेही घेतली असून त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध निर्देश जारी केले आहेत. त्यांनी ४५ दिवसांची मुदत दिली असून या दिवसात निवडणूका घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

तसेच त्यांनी असेही सांगितले आहे की भारतीय कुस्ती महासंघाने दिलेल्या वेळेस योग्य ती पावले उचलली नाहीत, तर भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घातली जाऊ शकते. तसेच अशा परिस्थितीत भारतीय कुस्तीपटू तटस्थ झेंड्याखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT