टीम इंडियाच्या (Team India) कामगिरीत सातत्याने सुधारणा करण्यावर आमचे लक्ष आहे. असे पुजाराने (Cheteshwar Pujara) सांगितले.  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: माझ्या अन् अजिंक्यच्या बॅटमधून लकरच शतक निघेल

रहाणे हा महान खेळाडू आहे. शतकापासून फक्त एक डाव तो दूर आहे. मी जेव्हा उपकर्णधार नव्हतो तेव्हा संघासाठी योगदान देतच होतो. टीम इंडियाच्या (Team India) कामगिरीत सातत्याने सुधारणा करण्यावर आमचे लक्ष आहे. असे पुजाराने (Cheteshwar Pujara) सांगितले.

दैनिक गोमन्तक

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिली कसोटी 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. सामन्यापूर्वी आज झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा (Team India) उपकर्णधार चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) त्याच्या आणि अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबद्दल सांगितले.

पुजारा म्हणाला, रहाणे हा महान खेळाडू आहे. शतकापासून फक्त एक डाव तो दूर आहे. तर आपल्या फलंदाजीबाबत बोलताना तो म्हणाला, खेळात सातत्या असल्याने लवकरच शतकही करु असे त्याने सांगितले. खेळाडूंच्या कारकिर्दीत असे चढ-उतार येतच असतात. या मालिकेत त्याच्याकडून मोठ्या खेळीची आशा आहे.

उपकर्णधार पदाबाबत आणि तीन महिन्यांनंतर कसोटी खेळताना सातत्याचा अभाव विचारले असता तो म्हणाला, मी जेव्हा उपकर्णधार नव्हतो तेव्हा संघासाठी योगदान देतच होतो. टीम इंडियाच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करण्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपकडे पाहत आहोत. कसोटी मालिकेनंतर मी आयपीएलमध्ये असल्याने क्रिकेटपासून दूर नव्हतो. त्यामुळे सातत्याचा अभाव नाही.

इंग्लंड मालिकेपासून माझ्या तंत्रात फारसा बदल झालेला नाही. फक्त दृष्टिकोन बदलतो. दडपण घेण्याऐवजी खेळाचा आनंद लुटण्यावर आम्ही भर देत आहोत. इंग्लंड मालिकेत मी तेच केले. त्याची मदत मालिकेतही होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर आम्ही सगळेच निराश होतो. त्यानंतर आम्ही एकत्र येऊन आमच्या खेळावर लक्ष दिले.

राहुल द्रविडबाबत बोलताना तो म्हणाला, राहुल सरांबाबत विचार केला तर त्यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ खेळाडू खेळले आहेत. त्यांनी अंडर-19 आणि इंडिया-अ मध्ये अनेक युवा खेळाडूंना घडविले आहे.

न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज नील वॅगनरच्या समोर खेळताना कोणता दृष्टिकोन असेल? दोन वर्षांपासून तुला शतकही करता आलेले नाही, त्याबद्दल काय सांगशील? असे विचारले असता पुजारा म्हणाला, नील वॅगनर हा न्यूझीलंडचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्याविरोधात आम्ही रणनीती आखत आहोत. आणि राहिला प्रश्न माझ्या शतकाचा मी संघासाठी योगदान देत आहे. जेव्हा शतक व्हायचे, तेव्हा ते होईलच. शुभमन गिलसंदर्भात सांगायचे तर, तो प्रतिभावान खेळाडू आहे. नक्कीच तो संघाचे सदस्य आहेत. पण तो कोणत्या क्रमांकावर खेळणार हे माहीत नाही. खेळपट्टीवर फिरकीची अपेक्षा असते. परंतु तरी मी अजून खेळपट्टी पाहिली नाही. घरच्या मैदानाचा आम्हाला नक्कीच फायदा आहे. तरी आम्ही आमच्या गेम प्लॅनवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही न्यूझीलंडला हलक्यात घेत नाही. कोणत्याही खेळात कधीकधी ब्रेक आवश्यक असतो. कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्त्वाचे असते.

भारतीय संघ: केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT