Brian Lara Twitter/ @SunRisers
क्रीडा

Sunrisers Hyderabad: 'हा' दिग्गज खेळाडू बनला SRH चा मुख्य प्रशिक्षक

Brian Lara: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या निराशाजनक हंगामानंतर सनरायझर्स हैदराबादने मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांना त्यांच्या पदावरुन हटवले आहे.

दैनिक गोमन्तक

Brian Lara: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या निराशाजनक हंगामानंतर सनरायझर्स हैदराबादने मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांना त्यांच्या पदावरुन हटवले आहे. फ्रेंचायझीने आता वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज ब्रायन लारा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. लारा यापूर्वी संघाचे मार्गदर्शक म्हणून काम करत होते. ते आता मुख्य प्रशिक्षक म्हणून सनरायझर्स कॅम्पची जबाबदारी सांभाळणार आहेत.

दरम्यान, SRH ने ट्विट करत लारा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. मुथय्या मुरलीधरन आता लारा यांचा सहाय्यक असेल. आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर मूडीज यांचा कार्यकाळ संपला होता. फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी त्यांना मुदतवाढ दिली नाही.

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) ट्विटमध्ये म्हटले की, "आमच्यासोबतचा त्यांचा कार्यकाळ संपत आहे. टॉम यांच्या SRH मधील योगदानाबद्दल आभार मानू इच्छितो. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा एक अद्भुत प्रवास आहे. भविष्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो."

तसेच, डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने 2016 मध्ये फक्त एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तथापि, आयपीएल 2022 मध्ये SRH ची कामगिरी निराशाजनक होती. टॉम मूडी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने 14 पैकी केवळ सहा सामने जिंकले होते. गुणतालिकेत ते आठव्या स्थानावर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

Cash For Job: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये शोषितांचे काय चुकले?

Child Abuse Awareness: गोव्यात एका वर्षात 202 बालकांवर अत्याचार; दुष्कृत्यांविरुद्ध लढण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज

Konkani Drama Competition 2025: कोकणी नाट्यस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘भोगपर्व’ प्रथम, जाणून घ्या संपूर्ण निकाल..

अग्रलेख: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये 'पूजा' कलंकित ठरली, परंतु तिचा ‘गॉडफादर’ कोण हे कळायलाच हवे..

SCROLL FOR NEXT