भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने (Badminton player P.V. Sindhu) धमाकेदार सुरुवात केली आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: सिंधुचा विजयी स्मॅश, पण नेमबाजीत, टेनिसमध्ये भारताचा पराभव

भारताच्या निशाणेबाज (Shooter) मनू भाकर आणि यशस्वीनी यांनी मात्र निराशा केली आहे. टेनिसच्या (tennis) दुहेरीत देखील भारताला धक्का बसला असून भारताची सानिया मिर्झा आणि अंकिता रैना या पहिल्याचा फेरीत बाहेर झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

टोकियो: टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने (Badminton player P.V. Sindhu) धमाकेदार सुरुवात करीत इजराइलच्या सोनिया पोलिकारपोवाचा सहज पराभव करत टोकियो ऑलिंपिकमध्ये विजयाने खाते उघडले आहे. परंतु दुसरीकडे भारताच्या निशाणेबाज (Shooter) मनू भाकर आणि यशस्वीनी (Shooters Manu Bhakar and Yashaswini) यांनी मात्र निराशा केली आहे. टेनिसच्या (tennis) दुहेरीत देखील भारताला धक्का बसला असून भारताची सानिया मिर्झा आणि अंकिता रैना (Sania Mirza and Ankita Raina) या पहिल्याचा फेरीत बाहेर झाल्या आहेत.

सिंधुचा विजयी स्मॅश

आज सकाळी झालेल्या सामन्यात पी.व्ही.सिंधुने पोलिकारपोवाचा 28 मिनिटांत 21-7, 21-10 असा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे. सिंधुने पहिला सेट 21-7 असा 13 मिनिटांमध्ये जिंकला तर दुसरा सेट 21-10 असा 16 मिनिटांमध्ये जिंकत सामना खिशात घातला. याआधी भारतीय पुरुषांच्या जोडीने ग्रुप ए मधील सामन्यात चीनी ताइपेच्या जोडीला 21-16 अशी मात दिली आहे.

भारताची जोडी मनू भाकर आणि यशस्वीनी यांचा पराभव झाला आहे.

नेमबाजीत मनू आणि यशस्वीनीचा पराभव

दुसरीकडे भारतीय निशाणेबाजांनी मात्र निराशा केली आहे. भारताची जोडी मनू भाकेर आणि यशस्वीनी यांच्याकडू भारताला पदकाची आशा होती परंतु त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी देखील खराब प्रदर्शन करत फायनल पासून वंचित राहिल्या आहेत. अपेक्षांचे ओझे शेवटच्या क्षणी या दोघी झेलू शकल्या नाहीत. मनूने सामन्याची सुरुवात चांगली केली त्यावेळी वाटले होते या दोघी फायनल आठमध्ये जागा मिळवू शकतील. परंतु पहिल्या सेटमध्ये 98 स्कोर केल्यानंतर त्यांनी 95, 94 आणि 95 असा स्कोर केला त्यामुळे त्या फायनल दहाच्या देखील बाहेर गेल्या आहेत.

सानिया मिर्झा आणि अंकिता रैना यांना महिलांच्या दुहेरीत पराभवाचा धक्का बसला असून भारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.

टेनिसमध्ये दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात

भारताच्या टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अंकिता रैना यांना महिलांच्या दुहेरीत पराभवाचा धक्का बसला असून भारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. सानिया आणि आंकिताने अनेक सोप्या संधी गमाविल्या, युक्रेनच्या दोन बहिणींनी सानिया आणि आंकिता यांचा तिसऱ्या सेटमध्ये 10-8 असा पराभव करत भारताचे दुहेरीतल आव्हान संपुष्टात आणले. सानिया आणि अंकिता यांनी सामन्याची सुरुवात धमाकेदार केली आणि पहिला सेट 6-0 असा सहज जिंकाला. मात्र युक्रेनच्या लियूडमेला किचेनोक आणि नादिया किचेनोक या बहिणींनी हार मानली नाही आणि दुसऱ्या सेट टायब्रेकरमध्ये 7-6 असा जिंकला अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात तिसऱ्या सेटमध्ये युक्रेनच्या या दोन्ही बहिणींनी कमबॅक केले आणि 10-8 असा तिसरा सेट जिंकत सानिया आणि अंकिताचे आव्हान संपुष्टात आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT