भारतात परतल्यानंतर मेरी कोमने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेत त्यांची माफीही मागितली. Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: पदक न जिंकल्याबद्दल मेरी कोमने मागितली पंतप्रधानांची माफी

पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा व्यतिरिक्त, रवी दहिया आणि दीपक पुनिया हे यावेळी उपस्थित होते. या दरम्यान, पीएम मोदींनी सर्व खेळाडूंशी चर्चा केली आणि फोटोही घेतले.

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पदक जिंकण्याची सर्वात मोठी आशा असलेल्या बॉक्सर मेरी कोमला (Boxer Mary kom) उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. भारतात परतल्यानंतर मेरी कोमने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेत त्यांची माफीही मागितली.

पंतप्रधान मोदींनी ऑलिम्पिकमधील खेळाडूंची भेट घेतली. ऑलिम्पिक खेळाडूंच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता. पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा व्यतिरिक्त, रवी दहिया आणि दीपक पुनिया हे यावेळी उपस्थित होते. या दरम्यान, पीएम मोदींनी सर्व खेळाडूंशी चर्चा केली आणि फोटोही घेतले.

मेरी कोम नरेंद्र मोदींना म्हणाली, "पदक न जिंकल्याबद्दल मला तुमची माफी मागण्याची इच्छा आहे." यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी म्हणाले, "क्रीडा विश्वात तुमचे खूप मोठे योगदान आहे. कारण तुम्ही देशात एक खास ओळख निर्माण केली आहे. तुला पाहून मुलींना पुढे जाण्याचे धैर्य मिळाले आहे. "

सहा वेळा विश्वविजेत्या मेरी कोमचे (51 किलो) दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, 2012 लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोमने टोकियोमध्ये आव्हानात्मक लढतीत तिने आपले सर्वोत्तम दिले पण तिला विजय मिळविता आला नाही. 38 वर्षीय दिग्गज बॉक्सरसाठी हे कदाचित शेवटचे ऑलिम्पिक असल्याचे सिद्ध झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT