Lenny D`Gama will be judging Olympic boxing competitions Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: गोव्याचे लेनी टोकियोला रवाना

ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेत (Olympic boxing competitions) मूल्यांकन करण्यासाठी लेनी डिगामा (Lenny D`Gama) यांची निवड झालेली आहे.

किशोर पेटकर

पणजी : टोकियो ऑलिंपिकमधील बॉक्सिंग स्पर्धेसाठी (Tokyo Olympic boxing competitions) निवड झालेले गोव्याचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (आयटीओ) लेनी डिगामा (Lenny D`Gama) सोमवारी रवाना झाले. ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेत (Olympic boxing competitions) ते मूल्यांकनकर्ते असतील. या कामगिरीसाठी निवड झालेले ते आशियातील एकमेव तांत्रिक अधिकारी आहेत.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा (Tokyo Olympics) 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होईल. बार्देश तालुक्यातील साळगाव येथील 67 वर्षीय लेनी राष्ट्रीय-आंतरारष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंगमधील अनुभवी तांत्रिक अधिकारी आहेत. 2012 पासून लेनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे आयटीओ आहेत. त्यांनी सात जागतिक स्पर्धांत पंचगिरी केली आहे. दोन ऑलिंपिक पात्रता स्पर्धा, तसेच आशियाई, जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत लेनी यांनी मूल्यांकनकर्त्यांची जबाबदारी पेलली आहे.

`माझ्यासाठी स्वप्नपूर्ती`

`आज (सोमवारी) संध्याकाळी मी टोकियोस रवाना होत आहे. तेथील ऑलिंपिकमध्ये कामगिरी पेलायची आहे. माझ्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे. बॉक्सिंगमध्ये आयटीओ-पंच-जज-मूल्यांकनकर्ता-निरीक्षक आदी जबाबदाऱ्या पेलू शकलो. ऑलिंपिकमध्ये माझ्या कामगिरीसाठी, शिवाय भारताला बॉक्सिंग, तसेच इतर खेळातही अधिकाधिक पदके मिळावीत यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी,`असे लेनी यांनी रवाना होण्यापूर्वी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

SCROLL FOR NEXT