पंजाब सरकारने राज्यातील 10 शाळांची नावे बदलून भारतीय पुरुष हॉकी संघाचा सन्मान केला आहे. Twitter/@PunjabGovtIndia
क्रीडा

Tokyo Olympics:भारतीय हॉकीपटूंचा पंजाब सरकारकडून अनोख्या पद्धतीने सन्मान

दैनिक गोमन्तक

Tokyo Olympics: पंजाब सरकारने (Government of Punjab) भारतीय हॉकीपटूंचा (Indian hockey) अनोख्या पद्धतीने सन्मान केला, पंजाबमधील या 10 शाळा ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणारे खेळाडूंच्या नावाने ओळखल्या जाणार (The 10 schools will be named after the athletes who won bronze in the Olympics) आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाने हॉकीपटूंच्या नावे पंजाब सरकारने राज्यातील 10 शाळांची नावे बदलून भारतीय पुरुष हॉकी संघाचा सन्मान केला आहे. ऑलिंपिकमध्ये कॅप्टन मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले. 41 वर्षांनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे. संघात मुख्यतः पंजाबमधील खेळाडू होते आणि सरकारकडून या खेळाडूनचा चांगला आदर करण्यात येत आहे.

पंजाबने हरियाणानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या क्रमांकाची तुकडी पाठवली होती, ज्यामध्ये 20 खेळाडूंनी खेळांमध्ये भाग घेतला होता. हॉकी संघाच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी, पंजाबने रविवारी 10 राज्य सरकारी शाळांचे नामकरण टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंच्या नावे केले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विजय इंदर सिंगला म्हणाले, कांस्यपदकाच्या ऐतिहासिक विजयाचा भाग म्हणून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भारतीय हॉकी खेळाडूंच्या सन्मानार्थ सरकारी शाळांचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे.

सिंग म्हणाले, शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळा (जीएसएसएस), मीठापूर, जालंधर या शाळेला हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याचे नाव देण्यात आले आहे. आता ही शाळा ऑलिम्पियन मनप्रीत सिंग शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळा, मीठापूर म्हणून ओळखली जाईल.

मनप्रीत सिंगचे सहकारी शमशेर सिंग, हरमनप्रीत सिंग, सिमरनजीत सिंग हे देखील 10 खेळाडूंमध्ये होते ज्यांच्या सन्मानार्थ या शाळांची नाव बदलण्यात आली आहेत.

· ऑलिम्पियन मनप्रीत सिंग शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, मीठापूर

· ऑलिम्पियन हरमनप्रीत सिंग जीएसएसएस, टिम्मोवल.

· ऑलिम्पियन शमशेर सिंग शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, अटारी

· ऑलिम्पियन रुपिंदरपाल सिंग शासकीय माध्यमिक शाळा, फरीदकोट

· ऑलिम्पियन हार्दिक सिंह जीएसएसएस, खुसरोपूर, जालंधर

· ऑलिम्पियन गुरजंत सिंग जीएसएसएस, खलिहारा, अमृतसर

· ऑलिम्पियन सिमरनजीत सिंग शासकीय हायस्कूल चहल कलाण, गुरदासपूर.

या आधी पंजाब सरकारने टोकियो ऑलिम्पिकमधून मायदेशी परतल्यानंतर खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी महत्त्वपूर्ण निधीची तरतूद केली होती. पंजाबचे क्रीडा आणि युवक सेवा मंत्री राणा गुरमित सिंह सोढी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील प्रत्येक हॉकी खेळाडूला 2.51 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. असे सांगितले आहे. सरकारने यापूर्वी एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले होते पण टोकियो ऑलिम्पिकच्या यशानंतर खेळाडूंचे पुरस्कार बदलण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT