Tokyo Olympics: Indian team during the game against Japan on Friday Twitter/@PrasarBharti
क्रीडा

Tokyo Olympics: चक दे इंडिया म्हणत हॉकीत भारताने जपानला 5-3 ने चारली धूळ

Tokyo Olympics: हॉकी मध्ये भारताने जपानचा 5-3 ने धुव्वा उडवला

Sanket Kulkarni

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय पुरुषांच्या हॉकी (Indian Mens Hockey Team) संघाने जपान (Japan) विरुध्द शानदार खेळाचे प्रदर्शन करीत जपानचा 5-3 असा पराभव केला आहे. (Tokyo Olympics: India defeats Japan in hockey)

भारताने तिसऱ्या क्वार्टरपर्यंत 3-2 अशी आघाडी कायम राखली होती. भारतासाठी पहिला गोल कप्तान हरमनप्रीत सिंह याने गोल केला. त्यानंतर 17 व्या मिनिटाला गुरजत सिंह याने गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळविली. जपानच्या तनाकाने पहिला गोल करत भारताने मिळविलेली आघाडी 2-1 अशी कमी केली.

त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताकडून 34 व्या मिनिटाला शमशेर सिंह याने गोल करत भारताची आघाडी 3-2 अशी वाढविली. पण जपानच्या लिए वाटानबे याने गोल करत भारताची आघाडी पुन्हा कमी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. यात भारताचा गोलकीपर श्रीजेश पी. आर याने चांगला डिफेन्स करत भारताचा विजय सोपा केला. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताकडून निलकंठ शर्मा याने गोल करत आघाडी पुन्हा वाढविली, त्यानंतर लगेचच सामना संपण्याच्या काही वेळ आधी भारताने 5-3 अशी भक्कम आघाडी केली. जपानने शेवटची 40 मिनिटे बाकी असताना 1 गोल करत कमबॅकचा प्रयत्न केला. पण त्यावेळी खूप उशीर झाला होता. भारताने हा सामना 5-3 अशा फरकाने खिशात घातला आणि ऑलिंपिक पदकाच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे टाकले.

सिंधुची उपांत्यफेरीत धडक

भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधुने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीचा 22-20, 21-13 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात सिंधुने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत हा सामना सरळ सेटमध्ये जिंकत अंतिम 8 मध्ये जागा मिळविली आहे.

सामन्यानंतर बोलताना सिंधु म्हणाली, पहिल्या गेमनंतर 15-16 अशा स्कोरनंतर मी काही गुण गमाविले कारण मी डिफेन्समध्ये घाई करत होती. त्यानंतर माझ्या प्रशिक्षकांनी मला माझ्या खेळातील त्रुटी मला सांगितल्या, त्यानंतर मी माझ्या रणनितीमध्ये बदलाव केला आणि पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मी चांगला खेळ करत आघाडी मिळवत ती कायम राखली आणि सामन्यात विजय मिळविला.

धावपटू दुती चंद मात्र अपयशी

भारताची धावपटू दुती चंद हिने ऑलिंपिक स्टेडियमवर महिलांच्या 100 मिटर धावण्यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले आहे. दुतीने 11.54 या वेळेत ही स्पर्धा समाप्त करत 7 व क्रमांक मिळवला. यामध्ये शेली-अ‍ॅन फ्रॅशर-प्राईस हिने प्रथम क्रमांक मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT