Tokyo Olympics: COVID clouds bloom over sporting event 
क्रीडा

टोकियो ऑलिंपिकवर कोरोनाचे सावट

दैनिक गोमंतक

टोकियो : ऑलिंपिकला (Olympics) आता एक महिना बाकी असताना जपानमध्ये (Japan) अनेक संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु कोरोना (Covid 19) ऑलिंपिकची पाठ सोडताना दिसत नाही. युगांडा संघातील आणखीन एका सदस्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह (Positive) आल्याचे समोर आले आहे.

युगांडाचा 9 जणांचा सदस्यीय संघ एका आठवड्यापूर्वी टोकियोमध्ये सरावासाठी दाखल झाला आहे. यात बॉक्सिंग संघ असून त्यांची राहण्याची व्यवस्था ओसाकामधील इझुमिसानो शहरात करण्यात आली आहे. जपानमध्ये दाखल झाल्यावर विमानतळावर येताच त्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये संघाचे प्रशिक्षक या चाचणीत पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे संघातील खेळाडूंना आता हॉटेलमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू प्रशिक्षकांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांना ३ जुलैपर्यंत विलगिकरणात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवणार आहे. तेथे त्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असता, त्यामध्ये देखील एक जण पॉजिटीव्ह आढळल्याचे समोर येत आहे. परंतु हा सदस्य संघासोबत होता की स्वतंत्र राहत होता हे आद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता युगांडाच्या प्रत्येक खेळाडूला हॉटेलमध्ये स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इन्शाअल्लाह, मी संपूर्ण चेकपोस्ट उडवून देईन… दहशतवादी उझैदची व्हॉट्सॲप चॅट व्हायरल; '005 ब्रिगेड' ग्रुपमध्ये रचला मोठा कट

आयएसआयसोबत बैठक अन् 22 दहशतवाद्यांची यादी! ऑपरेशन सिंदूरनंतर आता नवा खुलासा; POK मधील तळांबाबत जैश कमांडरची जाहीर कबुली

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

SCROLL FOR NEXT