Tokyo Olympics BCCI announces cash reward for India's medal winners Neeraj Chopra Bajrang Puniya
Tokyo Olympics BCCI announces cash reward for India's medal winners Neeraj Chopra Bajrang Puniya  Dainik Gomantak
क्रीडा

ऑलिम्पिक विजेत्यांचा BCCI करणार सन्मान, कोट्यवधींचा वर्षाव

दैनिक गोमन्तक

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) शनिवारी ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympic ) सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. त्याचबरोबर इतरही खेळाडू ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) मध्ये जिंकत सर्वोत्तम कामगिरी केली आहे अशा खेळाडूंनाही विविध क्षेत्रातील संस्थांकडून किंवा राज्य सरकारकडून वेगवेगळ्या स्वरूपात बक्षिसे जाहीर केली जात आहेत.आता यात जगातील सर्वात श्रीमंत अश्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही(BCCI) खेळाडूंसाठी भरघोस रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे.(Tokyo Olympics BCCI announces cash reward for India's medal winners)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांना रोख पारितोषिके जाहीर केले आहेत . बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सुवर्ण जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला एक कोटी, मीराबाई चानू आणि रवी दहिया सारख्या रौप्य पदक विजेत्यांना 50 लाख, पीव्ही सिंधू, लवलिना बोर्गोहेन आणि बजरंग पुनियासारख्या कांस्यपदक विजेत्यांना 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर पुरुष हॉकी संघाला1.25 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे देण्याचे जाहीर केले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

तसे पाहता खेळाडूंवर बक्षिसांची ही फक्त सुरवात मानली जात असून कालांतराने अनेक संस्था पुढे येतील त्याचबरोबर सर्व राज्य सरकारे आपल्या खेळाडूंसाठी सरकारी नौकरी सारखे गिफ्ट देत आहेत. तसेच आंनद महिंद्रा यांनी देखील सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राला XUV 7OO गाडी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स या टीमने सुद्धा नीरजसाठी १ कोटी रुपयांचे गिफ्ट दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT