Tokyo Olympics 2021: India's winning start in hockey Twitter@virendersehwag
क्रीडा

Tokyo Olympics 2021: हॉकीत भारताची विजयी सुरूवात

न्यूझीलंडनेही या सामन्यात भारताला अतिशय कठोर झुंज दिली.

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिम्पिकची(Tokyo Olympics 2021) सुरवात भारताने(India) विजयी सलामीने केली आहे. भारतीय संघाने हॉकीमध्ये(Hockey) विजयासह सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध(New Zealand) 3-2 असा विजय मिळवला. रविवारी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. (Tokyo Olympics 2021: India's winning start in hockey)

न्यूझीलंडनेही या सामन्यात भारताला अतिशय कठोर झुंज दिली.किवी संघाच्या रसेलने गेमच्या 6 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली मात्र अवघ्या 4 मिनिटांनंतर भारताने कमबॅक करत पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली. भारतासाठी रुपिंदर पाल सिंगने पहिला गोल केला.

सेकंड हाफमध्ये हरमनप्रीतसिंगने दुसरा गोल करत भारताला 2-1अशी आघाडी मिळवून दिली. पुढे ७ व्या मिनिटाला भारताने पुन्हा एकदा 1 गोल करत भारताने ही आघाडी 3-1 अशी वाढवली.

न्यूझीलंडच्या संघाने खेळाच्या 43 मिनिटांत गोल करत गेमच्या शेवटच्या सत्रात भारतावर दबाव निर्माण केला होता. पण भारताचा बचावही मजबूत होता त्यामुळे आणि भारताने सामना 3-2 ने जिंकला. यासह पुरुषांनी हॉकी स्पर्धेतील विजयासह भारताने आपला प्रवास सुरू केला आहे.

न्यूझीलंड सोबतच जपान, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि अर्जेंटिना हेदेखील भारताच्या गटात आहेत. येत्या काही दिवसांत भारताला या संघांसोबत खेळायचे आहे. ऑलिम्पिक हॉकीच्या इतिहासात भारत 8 सुवर्णपदकांसह सर्वात यशस्वी देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT