Tim Southee | New Zealand Dainik Gomantak
क्रीडा

Tim Southee: बेअरस्टोची विकेट साउदीसाठी ठरली विश्वविक्रमी, टी20 क्रिकेटमध्ये बनला 'नंबर वन'

New Zealand vs England: टीम साउदीने टी20 क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला आहे.

Pranali Kodre

Tim Southee becomes number one bowler in T20I Cricket :

बुधवारी (30 ऑगस्ट) न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात पहिला टी20 सामना पार पडला. चेस्टर-ल-स्ट्रीट येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने 7 विकेट्सने सामना जिंकला. पण असे असले तरी न्यूझीलंडकडून कर्णधार टीम साउदीने मोठा विक्रम नावावर केला आहे.

या सामन्यात साउदीने 3 षटकात 25 धावा देत 1 विकेट घेतली. त्याने जॉनी बेअरस्टोला इंग्लंडच्या डावाच्या पहिल्या षटकात बाद केले होते. त्याच्यासाठी ही विकेट विक्रमी ठरली. या विकेटसह साउदी आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने शाकिब अल हसनला मागे टाकले आहे.

साउदीच्या नावावर 111 आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये 141 विकेट्स झाल्या आहेत. त्याने दोनदा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला आहे. शाकिबने 117 आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये 140 विकेट्स घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या

  • 141 विकेट्स - टीम साउदी (111 सामने)

  • 140 विकेट्स - शाकिब अल हसन (117 सामने)

  • 130 विकेट्स - राशीद खान (82 सामने)

  • 119 विकेट्स - इश सोधी (99 सामने)

  • 107 विकेट्स - लसिथ मलिंगा (84 सामने)

इंग्लंडचा विजय

दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 139 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. तसेच फिन ऍलेन 21 धावा केल्या. या व्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. इंग्लंडकडून ल्यूक वूड आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 14 षटकात 4 विकेट्स गमावत 143 धावा करत पूर्ण केला. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने 54 धावांची खेळी केली. हॅरी ब्रुकने 43 धावांची खेळी केली. विल जॅक्सने 22 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून टीम साउदी, लॉकी फर्ग्युसन आणि इश सोधी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Retirement: क्रिडाविश्वात खळबळ, 'या' स्टार खेळाडूने अचानक निवृत्तीची केली घोषणा; 14 वर्षांच्या कारकिर्दीला ब्रेक

Kshatriya History: पौराणिक यदु, क्षत्रिय वंश; राजे बनलेले मेंढपाळ

Horoscope: 10 ऑगस्टपासून 'ग्रहण योग' सुरू; 'या' तीन राशींच्या अडचणी वाढणार

Goa Opinion: गोव्यात रिकामी जमीन दिसताच, त्यावर कब्जा करून तेथे नवीन इमले बांधण्याची स्पर्धाच सुरू आहे..

Cutbona Fishing Jetty: कुटबण जेट्टीवर पुन्हा कॉलराचा उद्रेक; 6 रुग्ण आढळले, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT